Join us

Unclaimed Deposits : तुमच्या जुन्या बँकेत पैसे आहेत, पण माहितीचं नाही, ते पैसे कसे मिळवायचे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:25 IST

Unclaimed Deposits : दावेदार किंवा वारसांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास त्या पैशांवर वैध दावा करता येणार आहे.

चंद्रपूर : देशातील बँका आणि नियामक संस्थांकडे तब्बल १.८४ लाख कोटी रुपये इतकी आर्थिक मालमत्ता 'बेवारस' अवस्थेत पडून आहे. या अंतर्गत, आरबीआयने "उद्गम" नावाचा एक केंद्रीकृत पोर्टल तयार केला आहे. दावेदार किंवा वारसांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास त्या पैशांवर वैध दावा करता येणार आहे.

अनक्लेम्ड पैसे सरकारकडे सुरक्षितजे खाते दहा वर्षांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय असते, त्या निधीस बँका डीईए फंडकडे काढून देतात. परंतु, दावेदारांना हे पैसे परत मागता येतात.  बेवारस अवस्थेत म्हणजे ते पैसे जे बचत खाते, चालू खाते किंवा स्थिरीकरण ठेवी इत्यादी खात्यांमध्ये असून, दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ होऊनही त्याचा मालकी हक्क कोणी केला नाही, काढले नाही. मेल-मालिका न झाल्यामुळे, पाळण्यात न आल्यामुळे अव्यवस्थित झालेले असतात.

अशा पैशांवर दावा कसा करायचा?दावेदारांनी संबंधित बँकेत अर्ज करावा त्यासोबत ओळख व मालकीचे पुरावे सादर करावे. काही बँका क्लेम फॉर्म ऑनलाइन / ऑफलाइन देतात. संबंधिन शाखेत भेट द्यावी. 

कोणकोणती कागदपत्रे आणि पुरावे लागणार?ओळखपत्र (पॅन, आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र इत्यादी), पत्ता पुराव (उदा. वीज बिल, पाणी बिले, निवास प्रमाणपत्र) खातेधारकाचे खाते माहिती/खाते क्रमांक/शाखा, मृत्यू झाल्यास वारसांना लागणारे मृत्यू प्रमाणपत्र व उत्तराधिकारी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र गोळा करून ते बँकेन द्यावे लागणार आहे.

'उद्गम' पोर्टलवर रक्कम शोधण्याची सुविधाअसा निधी शोधण्यासाठी यूडीजीएम पोर्टल (https://udgam.rbi.org.in/u nclaimed-deposits/#/login) वर जाऊन त्यांची नावे, पॅन, ओळख आधारावर अनक्लेम्ड निधी तपासू शकतात.

कागदपत्र जमा केल्यास सहज मिळणार पैसेउद्गम पोर्टलमुळे नागरिकांना एकाच ठिकाणी त्यांच्या गोपनीय निधी तपासता येणार आहेत. ही सेवा पारदर्शकतेचा महत्त्वाचा भाग असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दावेदारांनी लवकर कागदपत्रे जमा करावीत; नियम पूर्ण केल्यास त्यांचे पैसे सहज मिळू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Recover unclaimed bank deposits using RBI's UDGAM portal easily.

Web Summary : ₹1.84 lakh crore in unclaimed deposits are lying in banks. RBI's UDGAM portal helps claimants find and recover these funds by submitting necessary documents to the concerned bank. The money will be safe with the government.
टॅग्स :बँकपैसाशेती क्षेत्रशेतीव्यवसाय