बीड : परळी येथे आयोजित तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पो २०२६ मध्ये 'उमेद' च्या ६८ महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. (UMED Scheme)
प्रदर्शनातील स्टॉल्सना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, तर निवडक गटांना बँक कर्ज व शासन अनुदानाचे वितरण करून महिला उद्योजकतेला बळ देण्यात आले.(UMED Scheme)
१३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान परळी वैजनाथ येथे पशुसंवर्धन विभागामार्फत एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED) अंतर्गत राज्यातील व बीड जिल्ह्यातील गटांनी आपली उत्पादने सादर केली.
सखी महिला शेतकरी कंपनीला १२.२७ लाखांचा पहिला हप्ता
'उमेद' च्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत बर्दापूर येथील उमेद सखी महिला शेतकरी उत्पादक कंपनीला शासनाचा १२ लाख २७ हजार ५०० रुपये इतका प्रथम हप्ता प्रदान करण्यात आला.
हा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.
१४ फेब्रुवारी रोजी जिरेवाडी (ता. परळी) येथील तुळजाई महिला स्वयंसहाय्यता समूहाला दुग्ध व्यवसाय व शेळीपालनासाठी १५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले.
प्रदर्शनाला नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी
लाकडी शोभेच्या वस्तू, घोंगडी, फुलहार, विविध खाद्यपदार्थ यांना विशेष प्रतिसाद मिळाला. रसाची कुल्फी, लाकडी गाड्या व सजावटीच्या वस्तूंची सर्वाधिक विक्री झाली.
अनेक स्वयं-साहाय्यता समूहांनी चहा-नाश्ता, बाजरीची भाकरी, पिठलं, भेळ, चाट आदी पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली. महिला विद्यार्थी व नागरिकांनी स्टॉल्सना भेट देत महिलांचे कौतुक केले.
'पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ' – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 'पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मजबूत आधारस्तंभ आहे. हवामान जोखीम (Climate Risk) कमी करण्यासाठी आणि दुग्धोत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार आहोत.'
तंत्रज्ञानाचा वापर
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मिशन
एम्ब्रियो ट्रान्सप्लांट तंत्रज्ञान
सेक्स-सॉर्टेड सीमेनद्वारे उच्च दर्जाच्या कालवडींची पैदास
विदर्भ-मराठवाड्यात 'मदर्स डेअरी'सोबत करार
मुख्यमंत्र्यांनी पशुसंवर्धन क्षेत्राचा विकासदर २५% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले.
राज्यातील २८४१ पशुदवाखान्यांचे आधुनिकीकरण व फिरती पशु ॲम्ब्युलन्स सेवा मजबूत करण्याची घोषणा करण्यात आली.
‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ची घोषणा
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी गावातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ लवकरच आणणार असल्याची घोषणा केली.
महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
पुरस्कार व सन्मान
कार्यक्रमात राष्ट्रीय गोपाल रत्न -२०२५ पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रगतीशील पशुपालकांचा गौरव करण्यात आला. पशुसंवर्धन विभागाच्या 'महापशुधन वार्ता' मासिकाचा १० वा अंक व 'दिनदर्शिका २०२६'चे अनावरण करण्यात आले.
महा पशुधन एक्स्पो २०२६ हे केवळ प्रदर्शन न राहता ग्रामीण महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचे व्यासपीठ ठरले.
कर्ज-अनुदान वितरण, तंत्रज्ञानाधारित पशुधन विकास आणि नव्या योजनांच्या घोषणांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळणार असल्याचे चित्र आहे.
महिला बचत गटांच्या सहभागामुळे स्वयंपूर्णतेकडे वाटचाल अधिक वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : ७५ लाखांची बुटकी म्हैस; ५० लाखांचा ‘सोन्या’ बैल : परळीत पशुधनाचा जल्लोष!
Web Summary : At the Parli Pashudhan Expo 2026, UMED self-help groups received significant support. Financial assistance, including a ₹12.27 lakh installment to a women farmer company and ₹15 lakh for dairy farming, was distributed. The expo showcased rural products and technologies, aiming to boost the rural economy.
Web Summary : परली पशुधन एक्सपो 2026 में, उमेद स्वयं सहायता समूहों को महत्वपूर्ण समर्थन मिला। महिला किसान कंपनी को ₹12.27 लाख की किस्त और डेयरी फार्मिंग के लिए ₹15 लाख सहित वित्तीय सहायता वितरित की गई। एक्सपो का उद्देश्य ग्रामीण अर्थव्यवस्था को बढ़ावा देना है।