UMED Scheme : महिला स्वयंसहायता समूहांच्या बळकटीकरणासाठी केंद्र व राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, अकोला जिल्ह्यात सुमारे २० कोटी रुपयांच्या निधीतून 'उमेद मॉल' उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर(Akash Fundkar) यांनी केली. (UMED Scheme)
या मॉलमुळे बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होणार असून त्यांच्या उत्पादनांना स्थिर व्यासपीठ मिळणार आहे.(UMED Scheme)
ही घोषणा ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पं. लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे आयोजित 'वऱ्हाडी जत्रा' सरस विभागीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी करण्यात आली.(UMED Scheme)
या कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे व जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र काकड यांची उपस्थिती होती.
१०० दालनांमध्ये विविधता
'वऱ्हाडी जत्रा' प्रदर्शनात विविध जिल्ह्यांतील बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची ७० दालने उभारण्यात आली आहेत. तसेच वऱ्हाडी व पारंपरिक मराठमोळ्या खाद्यपदार्थांची ३० दालने अशी एकूण १०० दालने सजली आहेत.
पालकमंत्र्यांनी विविध कक्षांना भेट देऊन उत्पादनांची माहिती घेतली. हे प्रदर्शन २४ फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
'उमेद' मॉलमुळे कायमस्वरूपी बाजारपेठ
पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पुढाकारातून महिला बचत गटांसाठी विविध अर्थसाहाय्य, विपणन सुविधा आणि 'लखपती दीदी'सारख्या योजना राबविण्यात येत आहेत.
अकोल्यात उभारण्यात येणारा 'उमेद' मॉल हा बचत गटांसाठी मोठा टप्पा ठरणार असून, त्यांच्या उत्पादनांना सातत्याने बाजारपेठ उपलब्ध होईल.
महिला समूहांनी उत्पादनांमध्ये नावीन्य, गुणवत्ता आणि ग्राहकाभिमुखता वाढवावी, तसेच इतरांचे अनुकरण न करता स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
डिजिटल प्लॅटफॉर्मवर भर
खासदार अनुप धोत्रे यांनी बचत गटांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून उत्पादने देशभर पोहोचवावीत, असे सांगितले.
आमदार रणधीर सावरकर यांनी क्लस्टर डेव्हलपमेंटवर भर देत बाजारपेठेच्या गरजेनुसार वेगळेपण जपण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी उत्पादनांसाठी आकर्षक पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मानकीकरण आवश्यक असल्याचे नमूद केले.
जिल्ह्यात सध्या १३ हजार ५२८ स्वयंसहायता समूह कार्यरत असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी दिली.
अकोल्यातील 'उमेद' मॉल प्रकल्पामुळे महिला स्वयंसहायता समूहांना स्थिर बाजारपेठ, अधिक उत्पन्न आणि आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
हे ही वाचा सविस्तर : UMED Scheme : उमेद गटांना मिळालं मोठं गिफ्ट; महिलांना लाखोंची मदत जाहीर!
Web Summary : Akola will get a 'UMED Mall' with a ₹20 crore investment to empower women's self-help groups. This mall provides a permanent marketplace for their products, fostering economic independence and growth in the Akola district.
Web Summary : अकोला में महिला स्वयं सहायता समूहों को सशक्त बनाने के लिए 20 करोड़ रुपये के निवेश से 'उमेद मॉल' बनेगा। यह मॉल उनके उत्पादों के लिए स्थायी बाज़ार प्रदान करता है, जिससे अकोला जिले में आर्थिक स्वतंत्रता को बढ़ावा मिलता है।