Tur Kharedi : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, शासनाने तुरीच्या हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य केली आहे. (Tur Kharedi)
हमीभावाने तूर विक्री करायची असल्यास शेतकऱ्यांना २० फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची तूर हमीभाव केंद्रावर खरेदी केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(Tur Kharedi)
जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून तुरीची खरेदी केली जाणार असून, त्यासाठी एकूण ११ खरेदी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. सन २०२५-२६ या खरीप हंगामातील तूर सध्या काढणीच्या टप्प्यात असून येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बाजारात आवक होण्याची शक्यता आहे.(Tur Kharedi)
विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशनची सर्वाधिक केंद्रे
जिल्ह्यात सर्वाधिक खरेदी केंद्रे विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये यवतमाळ, घाटंजी, राळेगाव, कळंब, वणी, उमरखेड आणि झरी या ठिकाणी तुरीची हमीभावाने खरेदी होणार आहे. या सर्व केंद्रांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मार्केटिंग फेडरेशनच्या चार केंद्रांवर खरेदी
मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातूनही चार केंद्रांवर तुरीची खरेदी होणार आहे. यामध्ये पांढरकवडामधील पाटण तसेच आर्णी, पुसद आणि महागाव तालुक्यांचा समावेश आहे.
या केंद्रांसाठी ऑनलाईन नोंदणीसंदर्भातील पत्र व्यवहार पूर्ण करण्यात आला असून, नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
सेतू केंद्र व मोबाईलवरून नोंदणीची सुविधा
शेतकऱ्यांना तुरीची नोंदणी करण्यासाठी सेतू केंद्रावरून किंवा स्वतःच्या मोबाईलवरून (सेल्फ नोंदणी) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे सातबारा उतारा आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतरच हमीभाव केंद्रावर तूर विक्री करता येणार आहे.
खुल्या बाजारापेक्षा जास्त दर, नोंदणीला प्रतिसाद वाढण्याची शक्यता
शासनाकडून तुरीसाठी ८ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात येणार आहे. सध्या खुल्या बाजारात तुरीला ७ ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने भविष्यात दर घसरू नयेत, या खबरदारीने अनेक शेतकरी आधीच हमीभाव केंद्रावर नोंदणी करत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांना वेळेत नोंदणीचे आवाहन
हमीभावाचा लाभ घ्यायचा असल्यास २० फेब्रुवारीपूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असल्याने शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले आहे.
हे ही वाचा सविस्तर :Tur Market : तूर उत्पादकांना दिलासा; मोंढ्यात दररोज बीट सुरू वाचा सविस्तर
Web Summary : Farmers in Yavatmal can register online for guaranteed tur prices until February 20. Registration is available at designated centers. The price is ₹8,000 per quintal. Required documents include Saat-Bara and Aadhaar card.
Web Summary : यवतमाल के किसान 20 फरवरी तक गारंटीकृत तुर मूल्य के लिए ऑनलाइन पंजीकरण कर सकते हैं। पंजीकरण नामित केंद्रों पर उपलब्ध है। कीमत ₹8,000 प्रति क्विंटल है। आवश्यक दस्तावेजों में सातबारा और आधार कार्ड शामिल हैं।