Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबा सोडा, आवळ्याचं लोणचं खाऊन बघा, उन्हाळ्यात करा आवळा लोणचं, ही सोपी रेसिपी समजून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 18:26 IST

Amla Pickle : असे विविध प्रकार आवळ्यापासून तयार गृहोद्योग, महिला बचत गट, गृहिणींकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात.

गोंदिया : लोणचे, कँडी, मुरब्बासाठी आवळ्याची मागणी वाढली आहे. साधारणतः ८० रुपये किलो दराने त्यांची विक्री होत आहे. आठवडाभरात मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सण उत्सव आटोपले की, गृहिणी आवळ्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करतात.

हे पदार्थ वर्षभर टिकतात, तसेच आहारतज्ज्ञांच्या मते आवळ्याला शिजवले तरी त्यातील 'क' जीवनसत्व कमी होत नाही, त्यामुळे गूळ किंवा साखरेच्या पाकात आवळे शिजवून मुरब्बा, कँडी, आले व आवळे एकत्रित बारीक करून त्याचा रस, हिरवी मिरची घालून आवळ्याचे लोणचे, आवळा किसून त्यात हिरव्या मिरच्या बारीक करून ठेचा असे विविध प्रकार आवळ्यापासून तयार गृहोद्योग, महिला बचत गट, गृहिणींकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. यासाठी किमान चार ते पाच किलो आवळ्यांची सहज खरेदी केली जाते. 

घरीच बनविले जाते च्यवनप्राशकाही गृहिणी घरीच आवळ्याचे च्यवनप्राशही बनवितात. आवळा हा तुरट, आंबट असला तरी त्यात गूळ, साखर, तिखट घालून विविध पदार्थ बनविले की, त्याच्या सेवनाने तोंडाला चव येते. शरीरासाठी पोषक, गुणकारी असल्याने आवळा वर्षभर विविध पदार्थाच्या स्वरूपात खाण्यास प्राधान्य देतो. त्वचा, केसही आवळ्याने व्यवस्थित राहतात. महिला बचत गटातर्फेदेखील आवळ्यापासून तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत.

गृहोद्योग, महिला बचत गट, गृहिणींकडून मोठ्या प्रमाणात खरेदीआवळ्याची आवक वाढली असून, संक्रांतीपर्यंत आवळ्याचा हंगाम असतो. या कालावधीत शहरात सर्वाधिक आवळा लागतो, गृहोद्योग, महिला बचत गट, गृहिणींकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. त्यामुळे दररोज सर्व आवळा सहज विकला जातो. फारच कमी कालावधीत उपलब्ध राहत असल्याने त्याला मागणीही जास्त असते.

आवळ्यात 'क' जीवनसत्त्वहिवाळ्यात साधा आवळा किंवा खाद्य पदार्थाच्या माध्यमातून होणारे सेवन शरीरासाठी आरोग्यदायी आहे. या फळात सर्वाधिक प्रमाणात 'क' जीवनसत्त्व असते. त्यापासून विविध खाद्यपदार्थ बनविले तरी ते कायम राहते. म्हणूनच या फळास बहुगुणी असे म्हणतात. आवळ्यापासून तयार केलेले विविध पदार्थ वर्षभर घरात चवीनुसार खाण्यासाठी उपलब्ध असतात.  

टॅग्स :पाककृतीशेती क्षेत्रशेतीसमर स्पेशल