नितीन टाले
बदलत्या काळात पारंपरिक शेतीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना, धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा गावातील शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण शेती प्रयोगातून उल्लेखनीय यश मिळवले आहे. (Tomato Farming Success)
अवघ्या दोन एकर शेतीमध्ये टोमॅटो पिकाचे दहा लाखांहून अधिक रुपयांचे उत्पादन घेऊन त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. (Tomato Farming Success)
भाजीपाला उत्पादनाचे केंद्र ठरत असलेले दाभाडा
दाभाडा हे गाव सध्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील महत्त्वाचे भाजीपाला उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जात आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत येथील शेतकरी भाजीपाला, फळपिके व विविध नावीन्यपूर्ण पिकांचे उत्पादन घेत आहेत. येथील भाजीपाला अमरावती, पुलगाव, धामणगाव यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये नियमितपणे पाठवला जात आहे.
नावीन्यपूर्ण शेती प्रयोगाची सुरुवात
दाभाडा येथील शेतकरी विजय पणपालिया यांची शेती पिंपळखुटा शिवारालगत असून, ते नागपूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या शेतीची जबाबदारी संजय कचवे यांच्याकडे दिली असून, ते शेतीची प्रत्यक्ष देखभाल करतात. या शेतीमध्ये दिवाणजी म्हणून वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे राबवले गेले आहेत.
यापूर्वी याच शेतीत टरबूजाचे दहा लाखांहून अधिक उत्पादन, तसेच केळी व पपई यांसारखी पिकेही यशस्वीपणे घेण्यात आली होती. यंदा मात्र दोन एकरांवर टोमॅटोची लागवड करण्यात आली.
दोन एकरांतून दहा लाखांहून अधिक उत्पन्न
गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोचे उत्पादन सुरू असून, आतापर्यंत दहा लाखांच्या घरात विक्री झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
योग्य नियोजन, वेळेवर लागवड, सततची निगा आणि बाजारपेठेची अचूक माहिती यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
मजुरांना सातत्याने रोजगार
या टोमॅटो शेतीमुळे परिसरातील मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. यावर्षी पावसाळा जास्त असल्याने अनेक ठिकाणी मजुरांना काम मिळाले नाही; मात्र या शेतीत दहा ते बारा मजुरांना दररोज नियमित काम मिळत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला असून, हा सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे.
रानटी जनावरांचा त्रास असूनही चिकाटी
दाभाडा परिसरात रानटी जनावरांचा मोठा त्रास असून ज्वारी, मका यांसारख्या पिकांचे नुकसान होते. तरीही येथील शेतकरी दिवस-रात्र मेहनत करून आपल्या शेतात उत्पादन घेत आहेत. या चिकाटीमुळेच दाभाडा हे गाव भाजीपाला उत्पादनासाठी ओळख निर्माण करत आहे.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी यशकथा
दोन एकरात दहा लाखांहून अधिक उत्पन्न देणारी टोमॅटो शेती ही केवळ आर्थिक यशकथा नसून, नावीन्यपूर्ण विचार, नियोजनबद्ध शेती आणि मेहनतीचे उत्तम उदाहरण आहे. पारंपरिक शेतीतील मर्यादा ओलांडून भाजीपाला शेतीकडे वळल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते, हे या यशकथेमधून स्पष्ट होते.
दाभाडा गावातील हा प्रयोग परिसरातील तसेच तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
Web Summary : Dabhada farmers overcome traditional farming challenges with innovative tomato cultivation, earning over ten lakhs from two acres. Their success, driven by planning and market knowledge, provides local employment and inspires regional agriculture.
Web Summary : दाभाडा के किसानों ने टमाटर की खेती से दस लाख से अधिक कमाए। योजना और बाजार ज्ञान से प्रेरित उनकी सफलता, स्थानीय रोजगार प्रदान करती है और क्षेत्रीय कृषि को प्रेरित करती है।