Threshing Machine Safety : शेतीत वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मळणी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.(Threshing Machine Safety)
यामुळे शेतीकामे जलद आणि सोपी झाली असली तरी निष्काळजीपणामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे मळणी करताना शेतकरी व मजुरांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.(Threshing Machine Safety)
गेल्या काही वर्षांत मळणी यंत्रात हात अडकणे, सैल कपडे यंत्रात ओढले जाणे किंवा इतर गंभीर अपघात घडल्याच्या घटना वाढल्या आहेत.(Threshing Machine Safety)
विशेषतः गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांच्या मळणीदरम्यान धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
सैल कपडे टाळा, सुरक्षित अंतर ठेवा
तज्ज्ञांच्या मते, मळणी यंत्र चालू असताना त्यापासून सुरक्षित अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. सैल कपडे, ओढणी, स्कार्फ किंवा दागिने वापरणे टाळावे, कारण अशा वस्तू यंत्रात अडकून अपघात होण्याची शक्यता असते. तसेच, यंत्राजवळ लहान मुलांना अजिबात जाऊ देऊ नये.
महिलांनी घ्यावी विशेष काळजी
महिलांनी साडी नेसून काम करताना विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. साडीचा पदर किंवा ड्रेसची ओढणी यंत्रात अडकण्याचा धोका अधिक असल्याने सुरक्षित पोशाख वापरणे, केस व्यवस्थित बांधणे आणि यंत्रापासून योग्य अंतर ठेवणे आवश्यक आहे.
यंत्र बंद केल्याशिवाय हात घालू नका
मळणी यंत्रात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास यंत्र पूर्णपणे बंद केल्याशिवाय त्यात हात घालू नये. काम सुरू करण्यापूर्वी यंत्राची तपासणी करणे आणि नियमित देखभाल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रशिक्षण व तपासणी आवश्यक
मळणी यंत्र वापरताना सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊनच यंत्र वापरावे आणि वेळोवेळी तपासणी करून अपघात टाळावेत.- अमोल शिंदे, कृषी अधिकारी
शेतकऱ्यांचा अनुभव
मळणी यंत्रामुळे काम जलद होते; पण थोडीशी चूकही जीवावर बेतू शकते. त्यामुळे आम्ही आता सुरक्षित अंतर ठेवून आणि सर्व नियम पाळूनच काम करतो.- संजय ढोले, शेतकरी
सुरक्षिततेला प्राधान्य गरजेचे
यांत्रिकीकरणामुळे शेती अधिक वेगवान झाली असली तरी त्यासोबत जोखीमही वाढली आहे. त्यामुळे शेतकरी आणि मजुरांनी सावधगिरी बाळगून काम करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा, निष्काळजीपणामुळे गंभीर जखमा किंवा जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही.
मळणी यंत्राचा वापर करताना योग्य काळजी, प्रशिक्षण आणि सुरक्षितता नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात आणि शेती अधिक सुरक्षित बनू शकते.
अधिक वाचा : Agriculture News : शेतकऱ्यांनो, सावध राहा; 'ही' आग हिरावतेय हातातोंडाशी आलेला घास!
Web Summary : Increased mechanization raises thresher accidents. Farmers must prioritize safety: avoid loose clothing, maintain distance, and ensure machines are off before maintenance. Training and regular checks are crucial to prevent injuries and fatalities during threshing.
Web Summary : बढ़ते मशीनीकरण से थ्रेशर दुर्घटनाएँ बढ़ रही हैं। किसानों को सुरक्षा को प्राथमिकता देनी चाहिए: ढीले कपड़े न पहनें, दूरी बनाए रखें और सुनिश्चित करें कि मशीनें रखरखाव से पहले बंद हों। चोटों और मौतों को रोकने के लिए प्रशिक्षण और नियमित जांच महत्वपूर्ण हैं।