Electricity Subsidy : एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ अंतर्गत वीज सवलतीचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील सर्व यंत्रमाग घटकांनी सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
तसेच जे यंत्रमाग घटक वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणार नाही, आपोआप बंद करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार राज्यातील यंत्रमाग घटकांना वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणेकरिता तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात येत आहे.
वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीचा सुटसुटीत अर्ज मार्च २०२६ पासून उपलब्ध झाला आहे. त्यामुळे २६ एप्रिल २०२६ पर्यंत राज्यातील सर्व यंत्रमाग घटकांची ऑनलाईन नोंदणी मुदत देण्यात आली होती.
मात्र या कमी कालावधीत नोंदणी करणे शक्य होणार नाही. त्यानुसार ऑनलाईन नोंदणी करणेकरिता तीन महिन्याची मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
मृत्युपत्राने मिळणाऱ्या मालकी हक्कावर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल, वाचा कोर्ट काय म्हणाले
Web Summary : Maharashtra grants a three-month extension for weaving units to register on the textiles commissioner's portal to avail electricity subsidies under the integrated and sustainable textiles policy 2023-28. This provides additional time for compliance.
Web Summary : महाराष्ट्र ने एकीकृत और टिकाऊ वस्त्र नीति 2023-28 के तहत बिजली सब्सिडी का लाभ उठाने के लिए वस्त्र आयुक्त के पोर्टल पर पंजीकरण करने के लिए बुनाई इकाइयों को तीन महीने का विस्तार दिया। इससे अनुपालन के लिए अतिरिक्त समय मिलेगा।