Join us

Sugarcane Factory : कारखान्याचं कारस्थान? कोट्यवधींच्या रकमेवरून कामगार आक्रमक वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:57 IST

Sugarcane Factory : "हक्काचे पेमेंट मिळाले नाही, तर शांत बसणार नाही!" या निर्धाराने श्री विठ्ठल साखर कारखान्याचे व्यापारी आणि कामगार पुण्यात आंदोलन करत आहेत. शासनाच्या मदतीने मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर (Sugarcane Factory)

Pune : "हक्काचे पेमेंट मिळाले नाही, तर शांत बसणार नाही!" या निर्धाराने श्री. विठ्ठल साखर कारखान्याचे व्यापारी आणि कामगार पुण्यात आंदोलन करत आहेत. शासनाच्या मदतीने मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला आहे. (Sugarcane Factory)

सोलापूर जिल्ह्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने शासनाच्या थकहमीवर घेतलेल्या ३४७ कोटी ६७ लाख रुपयांच्या कर्जाचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक व्यापारी व कामगारांनी केला आहे. (Sugarcane Factory)

या पार्श्वभूमीवर पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयाबाहेर (साखर संकुल) मागील चार दिवसांपासून उपोषण सुरू असून, जोपर्यंत आम्हाला थकीत रक्कम मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. (Sugarcane Factory)

काय आहे प्रकरण?

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणूनगर (ता. पंढरपूर) यांना महाराष्ट्र शासनाच्या थकहमीवरून NCDC (नवी दिल्ली) या संस्थेकडून मागील थकबाकी भरण्यासाठी ३४७ कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते.

त्यामध्ये व्यापाऱ्यांच्या थकीत रकमेपोटी ५९.७५ कोटी रुपये आणि कामगारांच्या वेतनाच्या थकबाकीसाठी ४१.८७ कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते.

मात्र, ही रक्कम अद्याप संबंधित व्यापारी व कामगारांना वितरित झालेली नाही. यामुळे नाराज कामगार व व्यापारी पुण्यातील साखर संकुल येथे एकत्र आले असून त्यांनी चार दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. काय आहेत प्रमुख मागण्या

* थकीत रकमेचे त्वरित वितरण : व्यापारी व कामगारांना अनुक्रमे ५९.७५ कोटी व ४१.८७ कोटी रुपये तात्काळ दिले जावेत.

* संचालक मंडळ बरखास्त : कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची त्वरित बरखास्ती करून प्रशासकाची नेमणूक करावी.

* फौजदारी कारवाई : चेअरमन अभिजीत पाटील, उपाध्यक्ष व संचालक मंडळातील संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून वैयक्तिक मालमत्ता जप्त करावी.

* कर्जाच्या विनियोगाचा तपशील : शासनाकडून मिळालेल्या कर्जाचा विनियोग दाखला, खर्चाचे व्हाउचर्स, मंजुरीच्या प्रत व बँक स्टेटमेंट उपलब्ध करून द्यावेत.

* दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई : संबंधित दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे व त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत.

उपोषणकर्त्यांचा इशारा

सरकारने व कारखाना प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. आमचा संयम संपत चालला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यापारी आणि कामगार संघटनांनी दिली.

हे ही वाचा सविस्तर : Sugarcane Crushing : उसाच्या पळवापळवीचा काय झाला परिणाम वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसाखर कारखानेपंढरपूरसंप