Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रोकोली शेतीचा यशस्वी प्रयोग, 70 दिवसांत लाखो रुपयांचे उत्पन्न, वाचा ब्रोकोली शेतीचा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:30 IST

Broccoli Farming : चार गावांतील शेतकऱ्यांनी ब्रोकोलीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. ७० दिवसांत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

नंदुरबार : शासनाच्या निक्रा प्रकल्पांतर्गत धडगाव तालुक्यातील चार गावांत विविध पीक प्रयोग केले जात असून, चार गावांतील शेतकऱ्यांनी ब्रोकोलीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. ७० दिवसांत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

धडगाव तालुक्यातील कात्री, भूजगाव, खरवड, उमराणी व परिसरात हे पीक घेतले जात आहे. हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम अर्थात (निक्रा) हा प्रकल्प तालुक्यात सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत विविध पीक प्रयोगाचे आयोजन सुरू आहे. सद्यःस्थितीत वेगवेगळे नवीन पीक प्रयोगाचे आयोजन तालुक्यात केलेले आहे. 

हवामान अनुकूल, कमी पाण्यात येणारे तसेच रोग आणि किडीस बळी न पडणारे, कमी कालावधीत येणारे, भाजीपाला पिकांचे आयोजन केले जात आहे. ब्रोकोली या भाजीपाला पिकाची लागवड खरवड, धनाजे, भुजगाव येथे करण्यात आली होती. ब्रोकोली या भाजीपाला पिकाची लागवड करताना हिवाळ्यात करावी, कारण हे पीक थंड हवामानात येते. या पिकाचा कालावधी हा ६५ ते ७० दिवसांचा असतो. ब्रोकोली हे पीक आहारासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. 

यामध्ये कर्करोग प्रतीबंधात्मक गुणधर्म आहेत. यामध्ये जीवनसत्त्व 'क'चे प्रमाण असते. नियमित आहारात सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यावर्षी प्रथमच या वाणाची लागवड करण्यात आली आहे. साधारणपणे ८० ते १०० रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Broccoli Farming Success: Farmers Earn Lakhs in 70 Days

Web Summary : Nandurbar farmers successfully cultivated broccoli under the NICRA project, earning lakhs in 70 days. The climate-resilient crop, grown in villages like Katri, thrives in cool weather, offering high nutritional value and disease resistance. Market price is ₹80-100 per kg.
टॅग्स :शेती क्षेत्रपीक व्यवस्थापनशेती