Soybean Kharedi : अकोला जिल्ह्यातील सोयाबीन शेतकऱ्यांसाठी हमी भावाची खरेदी सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात खरेदीचा वेग अत्यंत मंद आहे. कारण एकच सोयाबीनमधील जादा ओलावा आहे. (Soybean Kharedi)
१२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असलेले सोयाबीन हमी दराने खरेदी करता येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यातील सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि पुरामुळे यंदा खरीप हंगामाला मोठा फटका बसला. त्यात बाजारात कमी दर असल्याने शेतकऱ्यांनी हमी खरेदी केंद्रांवर धाव घेण्याची अपेक्षा होती. पण ओलाव्याच्या निकषांमुळे अनेकांना आपला माल परत न्यायची वेळ आली आहे.(Soybean Kharedi)
सोयाबीनमध्ये ओलावा वाढला
* यंदा पावसाचा जोर शेवटपर्यंत कायम राहिला.
* सोयाबीन योग्यप्रकारे सुकू शकले नाही
* काटेडोलीचे प्रमाण वाढले
* दाण्यांमध्ये १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा आढळत आहे.
यामुळे मोठ्या प्रमाणात माल हमी खरेदीसाठी अपात्र ठरत आहे.
१५ नोव्हेंबरपासून सुरू खरेदी पण आवक अत्यल्प
अकोला जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून ६ केंद्रांवर हमी दराची खरेदी सुरू करण्यात आली आहे यात अकोला, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर येथे खरेदी सुरू आहे.
तथापि २१ नोव्हेंबरपर्यंत केवळ चार केंद्रांवर ६०५ क्विंटलच सोयाबीन खरेदी झाली.
केंद्रानुसार खरेदीची स्थिती (क्विंटलमध्ये)
अकोला : २०४.००
अकोट : १९९.५०
बार्शीटाकळी : १७८.००
मूर्तिजापूर : २३
या आकडेवारीवरून लक्षात येते की, आवक अत्यंत मर्यादित आहे आणि शेतकऱ्यांना हमी किमतीचा लाभ मिळत नाहीये.
ओलावा कमी करणार तरी कसा?
अनेक शेतकरी केंद्रांतून माल परत नेत आहेत कारण शेतात किंवा घराजवळ सुकवण्याची योग्य सोय नाही
सततचे थंड वातावरण आणि ऊन नसणे
ओलावा वेगाने कमी करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत.
हमिदराने खरेदी सुरू केली, पण निकष कडक ठेवले… 'मग आम्ही आमचा माल विकणार तरी कसा?' असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
शेतकऱ्यांचे वाढते नुकसान
बाजारात दर कमी
हमी खरेदी केंद्रांवर माल स्वीकारला जात नाही
माल परत नेण्याचा खर्च वाढतो
जास्त दिवस साठवणूक केल्यास दाणे खराब होण्याचा धोका
शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांची काय आहे मागणी?
* ओलाव्याचा निकष तात्पुरता शिथिल करावा
* कृषी विभागाने गावागावात "मोबाइल ड्रायर" उपलब्ध करून द्यावेत
* ओलावा कमी करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन मिळावे
* वेअरहाऊस वा मंडीमध्ये तात्पुरते सुकवणी केंद्र सुरू करावीत
जिल्ह्यात हमी दराची खरेदी सुरू असली तरी ओलाव्याच्या कडक निकषांमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत नाही. ६ केंद्रांपैकी चार केंद्रांवर ६०५ क्विंटल ही आकडेवारीच खरी परिस्थिती सांगते.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Kharedi : नाफेड नोंदणी सुरू… पण सोयाबीन खरेदी कुठे अडली? वाचा सविस्तर
Web Summary : Akola's soybean procurement faces hurdles due to high moisture content, exceeding the 12% limit. Despite six centers, only 605 quintals have been purchased, impacting farmers already struggling with crop losses and low market prices.
Web Summary : अकोला में सोयाबीन खरीद में नमी की अधिक मात्रा एक बाधा है, जो 12% सीमा से अधिक है। छह केंद्र होने के बावजूद, केवल 605 क्विंटल खरीदा गया है, जिससे फसल हानि और कम बाजार मूल्यों से जूझ रहे किसान प्रभावित हैं।