Join us

Soybean Crop Damage : शेंगामधील सोयाबीनच्या दाण्याला फुटले ‘अंकुर’; शेतकऱ्यांची अग्निपरीक्षा सुरूच वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 17:18 IST

Soybean Crop Damage : सततच्या पावसामुळे आता सोयाबीनच्या शेंगामधील दाण्यालाच अंकुर फुटला आहे. कापूस, भाजीपाला आणि धानावरही प्रतिकूल परिणाम झाला असून शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. शेतकऱ्यांचा सरकारला थेट सवाल 'वाट कसली बघता, ओला दुष्काळ जाहीर करा'. (Soybean Crop Damage)

अभय लांजेवार 

मराठवाडा व विदर्भासह राज्यभरात अतिपावसाने कहर केला आहे. आता तर उमरेड तालुक्यासह भिवापूर, कुही आणि परिसरातील शेतांमध्ये सोयाबीनच्या शेंगामधील दाण्यालाच अंकुर फुटू लागला आहे. (Soybean Crop Damage)

हे चित्र पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले आहे. सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे पिके अक्षरशः उद्ध्वस्त होऊ लागली आहेत.(Soybean Crop Damage)

अतिवृष्टीने उद्ध्वस्त नियोजन

यंदा शेतकऱ्यांनी बी-बियाणे, औषधे, फवारणी, मजुरी या सगळ्यावर प्रचंड खर्च करून सोयाबीन, कापूस, धानाची लागवड केली. अनेकांनी बँका, तर काहींनी सावकार गाठून कर्ज काढले. मात्र, पावसाने आंतरमशागती आणि फवारणीचे काम करु दिले नाही. थोडी उसंत मिळाली तरी नंतरच्या मुसळधार पावसाने तीही संपवली.

अंकुर फुटल्याने उत्पादनावर प्रश्नचिन्ह

शेतातील सोयाबीन शेंगा भरल्याच नाहीत, आणि ज्या भरल्या त्यातले दाणे पावसामुळे अंकुर फुटून सडू लागले आहेत.

कापसाची वाढ खुंटली असून धानाच्या रोपांवरही प्रतिकूल परिणाम दिसत आहे.

पावसाचा जोर असाच राहिला तर शेतातली पिके पूर्णतः नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांचा संताप व मागणी

नदी, नाले, पुलालगतच्या शेतात तर आधीच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आता शेतातले पिके सडत चालली आहेत.शेतकरी संतप्त होत म्हणतात, घरातील होता नव्हता तो पैसा लावला, पण पिकांचा घासच निसर्गाने हिरावला. 

सरकार अजूनही गप्प बसले, तर ही आमची अग्निपरीक्षाच ठरेल. 'वाट कसली बघता, ओला दुष्काळ जाहीर करा!'

कृषी तज्ज्ञांच्या मते, जर हवामान सुधारले नाही तर यंदा सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट येईल. शेतकऱ्यांचा पिकांवरचा विश्वासच डळमळीत होईल. शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मदतीची घोषणा करावी, अशी मागणी वेगाने वाढत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Kharif Crop Damage : शेती उद्ध्वस्त, कर्जाचा बोजा अन् सणांवर काळे ढग वाचा शेतकऱ्यांची व्यथा

English
हिंदी सारांश
Web Title : Sprouted Soybeans in Pods: Farmers Demand Immediate Drought Declaration

Web Summary : Heavy rains have caused soybean crops to sprout within pods, devastating farmers in the Umred region. Cotton and other crops are also suffering. Farmers are demanding the government declare a wet drought and provide immediate relief as harvests are threatened by continuous rainfall and crop rot.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनपीकशेतकरीशेती