Join us

Soybean Biyane Case: शेतकऱ्यांना मिळला न्याय; बियाणे फसले, आता भरपाई मिळणार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:53 IST

Soybean Biyane Case : "पेरलं… पण उगवलंच नाही!" उमरखेड तालुक्यातील एका शेतकऱ्याचा हा आक्रोश अखेर ग्राहक आयोगाच्या दारात न्याय मिळवून गेला. 'उत्तम सिड्स'च्या (Uttam Seeds) बियाण्यांनी अपेक्षित उगम न दिल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले. कंपनी आणि विक्रेत्याच्या टाळाटाळीनंतर अखेर ग्राहक आयोगाने शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय देत भरपाईचा दणका दिला आहे. (Soybean Biyane Case)

Soybean Biyane Case : "पेरलं… पण उगवलंच नाही!" उमरखेड तालुक्यातील एका शेतकऱ्याचा हा आक्रोश अखेर ग्राहक आयोगाच्या दारात न्याय मिळवून गेला. (Soybean Biyane Case)

'उत्तम सिड्स'च्या (Uttam Seeds) बियाण्यांनी अपेक्षित उगम न दिल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले. कंपनी आणि विक्रेत्याच्या टाळाटाळीनंतर अखेर ग्राहक आयोगाने शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय देत भरपाईचा दणका दिला आहे. (Soybean Biyane Case)

यवतमाळ येथील उमरखेड तालुक्यातील आकोली येथील कृष्णा गणेशराव कलाणे या शेतकऱ्याने 'उत्तम सिड्स'  (Uttam Seeds) कंपनीच्या JS 9305 वाणाचे सोयाबीन बियाणे विकत घेतले. (Soybean Biyane Case)

पेरणीसाठी सर्व प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली गेली, मात्र, बियाणे उगवलंच नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

बियाण्याचा दोष : लॉट नं. 70881

कलाणे यांनी वापरलेला बियाण्याचा लॉट नंबर 70881 हा दोषयुक्त ठरला आहे. याच लॉटचा वापर इतर शेतकऱ्यांनी केला असल्यास, ग्राहक आयोगाचा निर्णय त्या सर्वांवर लागू होईल, असे निकालपत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

उगवण फक्त २६ टक्के

१.३० हेक्टर क्षेत्रात पेरणी करून देखील केवळ २६ टक्के बियाण्यांची उगवण झाली. कंपनी आणि विक्रेत्याकडे भरपाईची मागणी केली असता त्यांनी ती नाकारली. यानंतर कलाणे यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली.

आयोगाचा खडसावणारा निर्णय

अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे आणि सदस्य अमृता वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत कंपनीच्या विरोधात निर्णय देण्यात आला. 'उत्तम सिड्स' व विक्रेता वासवी ॲग्रो सेंटरने ९९ हजार ६४० रुपये नुकसान भरपाई अधिक ८% व्याज, २० हजार रुपये मानसिक त्रास, व १०,००० रुपये तक्रार खर्च देण्याचे आदेश दिले आहेत.

आधारभूत किमतीवर भरपाई

भारत सरकारने सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत ३ हजार ८८० रुपये प्रति क्विंटल जाहीर केली होती. याच किमतीच्या आधारे पिकाचे अंदाजित उत्पादन आणि नुकसान विचारात घेऊन भरपाईचे गणित ठरवण्यात आले.

ही केस केवळ कृष्णा कलाणे यांची नसून, शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना पुरावे, बिलं, बॅच नंबर नोंदवून ठेवण्याचे महत्व अधोरेखित करणारी आहे. बियाण्यांमध्ये दोष आढळल्यास ग्राहक आयोग हे एक प्रभावी व्यासपीठ ठरू शकते, हे या निर्णयातून पुन्हा सिद्ध झाले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Kapas Biyane Case : शेतकऱ्याचा विजय: सदोष कापूस बियाणे प्रकरणी ग्राहक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनशेतकरीशेती