Join us

Solar Pump Yojana : सोलर पंप लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:47 IST

Solar Pump Yojana : मागेल त्याला सोलर पंप योजनेत (Solar Pump Yojana) अनेक एजंटचा सुळसुळाट झाला आहे.

यवतमाळ : एकीकडे शासनाच्या मागेल त्याला सोलर पंप (Solar Pump Yojana)  शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. अनेकांचे अर्ज मंजूर होत आहेत. तर काही शेतकऱ्यांचे जॉईंट सर्व्हे होत असून काही शेतकऱ्यांना सोलर पॅनल बसवून दिले जात आहे. मात्र या योजनेत अनेक एजंटचा सुळसुळाट झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात फसवणुकीचा (Solar Fraud Case) प्रकार समोर आला आहे. 

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सोलर पंप योजना (Solar Pump Scheme) राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात फसवणुकीची घटना घडली आहे. तालुक्यातील तेलंगटाकडी येथील शुभम भीमराव पाटील या शेतकऱ्याच्या बाबत ही घटना घडली आहे. सोलर पंप लावून देण्याच्या नावाखाली या शेतकऱ्याला गंडा घातला आहे. 

दरम्यान या शेतकऱ्याच्या शेतात सोलर पंप अपडेट (Solar Pump Update) करुन त्यावर मेडा कंपनीकडून सोलरसाठी सरकारी अनुदान देतो. त्यावर ०५ ते ७.०५ एच.पी.ची मोटार मिळवून देतो, असे म्हणून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चार लाख १५ हजार १०१ रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी पवन प्रमोद गौरकार रा. स्वप्नीलनगर वडगाव यवतमाळ याच्याविरुद्ध कलम ४०६, ४२० भान्यासं अंतर्गत पांढरकवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

इथे करा तक्रार 

मागेल त्याला सोलर पंप योजनेत लाखो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे या योजनेच्या नावाखाली एजंटचा सुळसुळाट सुरु आहे. अनेक शेतकरी यात फसले जाऊ शकतात. म्हणून शेतकऱ्यांनी सतर्क राहून कोणत्याही व्यक्तीला माहिती दयावी. किंवा काही महती हवी असल्यास थेट मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या  अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल. 

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीयवतमाळ