Join us

Solar Panel : सौरऊर्जेतील क्रांती: अकोल्यात तयार झाला स्वयंचलित स्वच्छता ड्रोन! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 16:46 IST

Solar Panel : सौरऊर्जा प्रकल्पांच्या देखभालीत क्रांती घडवणारे तंत्रज्ञान अकोल्यात विकसित करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात एक अभिनव आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान (Drone) तयार करण्यात आले आहे. वाचा सविस्तर (Solar Panel)

Solar Panel : सौरऊर्जा प्रकल्पांच्या देखभालीत क्रांती घडवणारे तंत्रज्ञान अकोल्यात विकसित करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात एक अभिनव आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान तयार करण्यात आले आहे. (Solar Panel)

जे अवघ्या ३० मिनिटांत १ मेगावॉट क्षमतेच्या सौर पॅनल्सची स्वच्छता करू शकते. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित, स्वयंचलित आणि श्रममुक्त पद्धतीने कार्य करणारा हा ड्रोन (Drone) केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर ऊर्जाक्षेत्रातील शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. (Solar Panel)

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात एक ऐतिहासिक व पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि इंडियन ड्रोन  (Drone) रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त प्रयत्नांतून फक्त ३० मिनिटांत १ मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे पॅनल (Solar Panel) स्वच्छ करणारा स्वयंचलित ड्रोन यशस्वीरित्या तयार करण्यात आला आहे.

या ड्रोनमुळे सौरऊर्जा प्रकल्पाच्या देखभालीतील एक मोठे आव्हान सोपे झाले असून, वेळ, पाणी आणि श्रमांची मोठी बचत होणार आहे. यासोबतच, सौर पॅनल स्वच्छतेच्या कार्यक्षम व्यवस्थेमुळे ऊर्जा उत्पादनात सातत्य आणि वाढ सुनिश्चित केली जाणार आहे.

धूळ हटली की कार्यक्षमता वाढते!

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात ६०० किलोवॉट क्षमतेचा सौर प्रकल्प कार्यरत आहे. या पॅनल्सवर धूळ जमा झाल्याने उत्पादनात घट होते. पारंपरिक पद्धतीने सफाई करताना वेळ, मनुष्यबळ आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या पार्श्वभूमीवर, ड्रोनच्या माध्यमातून स्वयंचलित आणि जलद सफाई ही एक क्रांतिकारी संकल्पना ठरली आहे.

ड्रोन विकासामागील शास्त्रज्ञांचे योगदान

डॉ. एस. आर. काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशिष भास्कर हांडे (व्यवस्थापकीय संचालक, इंडियन ड्रोन रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रा. लि.) यांच्या नेतृत्वाखाली या ड्रोनची निर्मिती करण्यात आली. या तंत्रज्ञानाचे विद्यापीठात प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव, तंत्रज्ञानाचे कौतुक

प्रात्यक्षिकावेळी विभाग प्रमुख डॉ. सुचिता गुप्ता, डॉ. एम. एम. देशमुख, डॉ. प्रमोद बकाने, डॉ. अनिल कांबळे, डॉ. मृदुलता देशमुख, धीरज कराळे आणि अनेक विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी या नावीन्यपूर्ण संशोधनाचे भरभरून कौतुक केले.

ऊर्जा क्षेत्रासाठी क्रांतिकारी पाऊल

या ड्रोनचा उपयोग भविष्यात औद्योगिक सौरऊर्जा प्रकल्पांमध्येही केला जाऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. हे संशोधन स्वच्छ आणि कार्यक्षम ऊर्जा निर्मितीकडे वाटचाल करणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : New Variety : नवे संशोधन : अकोल्याच्या कृषी विद्यापीठाच्या हळद, वांगी वाणांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीअकोलाकृषी विज्ञान केंद्र