Soil Testing Lab : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आता माती परीक्षणासाठी दूरवर जाण्याची गरज नाही. गावातच आता प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहे. (Soil Testing Lab)
जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू होत असून, यामुळे वेळ, खर्च आणि श्रम वाचणार आहेत. तसेच मातीच्या गुणवत्तेनुसार पिकांचे नियोजन करून उत्पादनात वाढ साधता येणार आहे. (Soil Testing Lab)
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वाची योजना लवकरच राबवली जाणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन सुपिकता कार्यक्रमासाठी २०२५-२६ या वर्षात बुलढाणा जिल्ह्यात एकूण १५ ग्रामस्तरीय मृदा नमुना तपासणी प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत. (Soil Testing Lab)
या प्रयोगशाळांमुळे शेतकऱ्यांना आता माती परीक्षणासाठी दूरवर जावे लागणार नाही, तर जवळच्या गावातच तपासणी करून वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.(Soil Testing Lab)
राज्यातील वार्षिक कृती आराखड्यात ४४४ नवीन ग्रामस्तरीय मृदा परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणी १५ प्रयोगशाळा सुरू होतील. (Soil Testing Lab)
या प्रयोगशाळा चालविण्याची संधी कृषी चिकित्सालय, कृषी व व्यवसाय केंद्र, माजी सैनिक, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, निविष्ठा विक्रेते, बचत गट तसेच शालेय व महाविद्यालयीन तरुण-तरुणींना मिळणार आहे.(Soil Testing Lab)
दीड लाख रुपये अनुदान
प्रत्येक प्रयोगशाळेसाठी शासनाकडून १.५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. हे निधी आवश्यक उपकरणे, साहित्य व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरले जाणार आहेत.
निवड प्रक्रिया आणि लक्ष्य
जर प्राप्त अर्जांची संख्या ठरवलेल्या लक्षांकापेक्षा जास्त झाली, तर जिल्हास्तरीय समितीमार्फत पारदर्शक सोडत काढून अर्जदारांची निवड केली जाईल. २०२५-२६ या वर्षासाठी जिल्ह्यातील ग्रामस्तरीय प्रयोगशाळांकडून २ लाख २२ हजार मृद नमुन्यांची तपासणी करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
पात्रता निकष
वय : १८ ते २७ वर्षे
किमान शैक्षणिक पात्रता : दहावी (विज्ञानासह) उत्तीर्ण
संगणक ज्ञान : एमएस-सीआयटी प्रमाणपत्र आवश्यक
प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी स्वतः कडे ४ वर्षांपेक्षा जुन्या नसलेल्या इमारतीचा ताबा असणे
आधारकार्ड आवश्यक
येथे संपर्क साधावा
अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२५ असून, इच्छुकांनी आपले अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जैविक कीड प्रयोगशाळा, बुलढाणा येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, बुलढाणा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
...तर समितीकडून सोडत
जर प्राप्त अर्जाची संख्या निश्चित लक्षांकापेक्षा जास्त असेल, तर जिल्हास्तरीय निवड समितीकडून पारदर्शक सोडत प्रक्रिया राबवून अर्जदारांची निवड केली जाईल.
जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद नमुना तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. अधिक माहितीकरिता जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, बुलढाणा यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज स्वीकारणे सुरू आहे. - मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा
हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla : पिक संरक्षणासाठी करा हे उपाय; वाचा कृषी सल्ला सविस्तर