Shetkari Abhyas Daura : राज्यातील शेती अधिक आधुनिक, स्पर्धात्मक आणि शाश्वत करण्याच्या उद्देशाने कृषी विभागातर्फे यावर्षी ५२ प्रगतिशील शेतकऱ्यांचा युरोपातील प्रगत कृषी देशांमध्ये अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे.(Shetkari Abhyas Daura)
या दौऱ्यात अमरावती विभागातील २५ शेतकरी आणि दोन कृषी अधिकाऱ्यांचा समावेश असून, अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी त्यांना मिळणार आहे.(Shetkari Abhyas Daura)
राज्यातील विविध भागांतील निवडक शेतकऱ्यांना जागतिक पातळीवरील शेती पद्धती, मूल्यवर्धन प्रक्रिया आणि सहकारी व्यवस्थेचा अभ्यास करून राज्यात त्याची अंमलबजावणी करता यावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.(Shetkari Abhyas Daura)
चार देशांत अभ्यास
हा अभ्यासदौरा फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्स या देशांमध्ये होणार आहे.
सहभागी शेतकरी पुढील बाबींचा सखोल अभ्यास करणार आहेत.
* आधुनिक पीकपद्धती व यांत्रिकीकरण
* सेंद्रिय शेती तंत्रज्ञान
* दुग्धव्यवसाय व प्रक्रिया उद्योग
* हरितगृह तंत्रज्ञान
* जलसंधारण व हवामान बदलाशी सुसंगत शेती
* फ्रान्स व स्वित्झर्लंडमधील अभ्यास
फ्रान्स येथे व्यावसायिक धान्यशेती आणि प्रगत दुग्धप्रकल्पांना भेटी दिल्या जाणार आहेत. मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि बाजारपेठ व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात येईल.
स्वित्झर्लंडमध्ये सेंद्रिय शेती संशोधन संस्था एफआयबीएल (FiBL) येथे सेंद्रिय शेतीवरील संशोधन आणि पर्वतीय दुग्धव्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला जाणार आहे.
नेदरलँड्समधील फुलबाजार व हरितगृह तंत्रज्ञान
नेदरलँड्समध्ये जागतिक स्तरावरील फूलबाजार सहकारी संस्था रॉयल फ्लोरा हॉलंड (Royal FloraHolland) येथे आंतरराष्ट्रीय फूलबाजारपेठ, लिलाव पद्धती आणि अत्याधुनिक हरितगृह तंत्रज्ञानाचा अभ्यास केला जाणार आहे.
फुलशेती, निर्यात व्यवस्थापन आणि सहकारी रचना याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे.
अमरावती विभागातील २५ शेतकरी सहभागी
अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच अशा २५ शेतकऱ्यांचा या विदेश अभ्यासदौऱ्यात समावेश आहे. याशिवाय दोन कृषी अधिकारीही सहभागी झाले आहेत.
या दौऱ्यानंतर सहभागी शेतकरी आपल्या जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील, तसेच आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढ, मूल्यवर्धन आणि निर्यात संधी याबाबत माहिती देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे राज्यातील शेतीत नवसंशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबाला चालना मिळेल. शाश्वत आणि हवामानपूरक शेती पद्धती राबविण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल. - गणेश घोरपडे, विभागीय कृषी सहसंचालक
शेतकऱ्यांचा हा युरोप अभ्यासदौरा राज्यातील कृषी क्षेत्रासाठी नवी दिशा ठरू शकतो. जागतिक पातळीवरील यशस्वी शेती मॉडेल्सचा अभ्यास करून महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम आणि निर्यातक्षम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Melghat Orange Palash : अविश्वसनीय नजारा! मेळघाटात पळसाच्या बहराने जंगल केशरी
Web Summary : Maharashtra sends 52 farmers to Europe to study advanced agriculture. The tour includes France, Switzerland, Germany, and the Netherlands. Farmers will learn modern techniques, organic farming, dairy, and greenhouse technology. The goal is to implement these practices in Maharashtra, boosting agricultural sustainability and exports.
Web Summary : महाराष्ट्र ने 52 किसानों को उन्नत कृषि का अध्ययन करने के लिए यूरोप भेजा। दौरे में फ्रांस, स्विट्जरलैंड, जर्मनी और नीदरलैंड शामिल हैं। किसान आधुनिक तकनीक, जैविक खेती, डेयरी और ग्रीनहाउस तकनीक सीखेंगे। लक्ष्य महाराष्ट्र में इन प्रथाओं को लागू करना, कृषि स्थिरता और निर्यात को बढ़ावा देना है।