Shet Jamin Patta : "पट्टा" म्हणजे सरकारकडून एखाद्या व्यक्तीला शेती किंवा अन्य विशिष्ट उपयोगासाठी जमीन तात्पुरत्या हक्काने दिली जाते. ह्या जमिनीला पट्ट्याची जमीन, लीज होल्ड लँड, किंवा भाडेपट्टा जमीन असेही म्हणतात.
कोणाला मिळू शकतो शेतीसाठी पट्टा ?
- भूमिहीन शेतकरी.
- अनुसूचित जाती/जमातीचे नागरिक.
- विशेष मागासवर्गीय, गरजूंना.
- स्वयंसहायता गट, शेतकरी गट.
- ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखालील गायरान जमीन शेतीसाठी.
शेतीसाठी पट्टा मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रियाजमिनीचा स्रोत ओळखागायरान जमीनबिनवापराची शासकीय जमीनवनजमीन (तयार प्रकल्पाअंतर्गत)ग्रामपंचायतीच्या ताब्यातील जमीन
अर्जामध्ये खालील माहिती असावी : तुमचं पूर्ण नाव व पत्ता.शेतीसाठी जमीन हवी आहे याचे कारण.जमीन किती हवी (एकर/हेक्टर).तुम्ही शेती कशी करणार आहात याचे प्रस्ताव.गरजू असल्याचे प्रमाणपत्र (जर असेल तर).
लागणारी कागदपत्रंओळखपत्र, आधार कार्ड / राशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, भूमिहीन असल्याचा दाखला, जातीचा दाखला (जर लागू होत असेल)
अर्ज कुठे करायचा ?तहसील कार्यालय / ग्रामपंचायत / तालुका कृषी अधिकारी - या ठिकाणी अर्ज द्यावा लागतो. तलाठी व मंडळ अधिकारी पट्ट्याची जमीन उपलब्ध आहे का याची तपासणी करतात. अर्जदाराची पात्रता तपासतात. संबंधित अधिकारी प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठवतात. जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी मंजूरी देतो. मंजुरीनंतर पट्टा प्रमाणपत्र / आदेशपत्र दिला जातो.
पट्ट्याची वैधता कालावधीसहसा 5 ते 15 वर्षांपर्यंत असतो.शेती नियमानुसार करत राहिल्यास नूतनीकरण (renewal) करता येतो.
शेतीसाठी मिळणाऱ्या जमिनीचे प्रकार (शासकीय योजना अंतर्गत)
- गायरान जमीन पट्ट्यावर देणे योजना
- ही जमीन ग्रामपंचायतकडे असते.
- ग्रामसभेच्या ठरावानंतर, तहसीलदाराच्या शिफारशीने दिली जाते.
- शर्त - फक्त शेतीसाठीच वापर.
पट्टा घेतल्यानंतर पाळायचं काय?
- ७/१२ वर तुमचं नाव येत नाही पण "पट्टेदार" अशी नोंद होते.
- दरवर्षी जमीन वापर अहवाल पंचायत/तलाठी कडे द्यावा लागतो.
- शेती केल्याचा पुरावा पीक पाहणी, सिंचन, खत वापर ठेवावा लागतो.
- पट्टयाची अट मोडली (शेती न करणे, जमीन उपेक्षित ठेवणे) तर तो रद्द होतो.
Web Summary : Learn the process of obtaining agricultural land lease in Maharashtra. भूमिहीन farmers, disadvantaged groups, and self-help groups can apply. The process involves identifying land sources, submitting an application with necessary documents to the Tahsil office, and adhering to lease terms for renewal.
Web Summary : महाराष्ट्र में कृषि भूमि पट्टा प्राप्त करने की प्रक्रिया जानें। भूमिहीन किसान, वंचित समूह और स्वयं सहायता समूह आवेदन कर सकते हैं। प्रक्रिया में भूमि स्रोतों की पहचान करना, तहसील कार्यालय में आवश्यक दस्तावेजों के साथ एक आवेदन जमा करना और नवीनीकरण के लिए पट्टे की शर्तों का पालन करना शामिल है।