Sericulture Farming : पारंपरिक शेतीच्या मर्यादा ओळखून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता पर्यायी व शाश्वत उत्पन्नाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. (Sericulture Farming)
'महारेशीम अभियान'च्या माध्यमातून रेशीम उद्योगाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत असून जिल्ह्यात तुती लागवडीचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. (Sericulture Farming)
सध्या तब्बल ४५४ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली असून हा बदल शेतीत नव्या संधी निर्माण करणारा ठरत आहे.(Sericulture Farming)
अभियानाला मिळतोय वाढता प्रतिसाद
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ४ फेब्रुवारीपासून 'महारेशीम अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
आतापर्यंत १२० नवीन शेतकऱ्यांची नोंदणी
७८ गावांतील ४४७ शेतकरी रेशीम शेतीकडे वळले
तुती लागवड क्षेत्र ४५४ एकरांवर पोहोचले
रेशीम शेती ही केवळ पूरक व्यवसाय न राहता आता शाश्वत उत्पन्नाचा मजबूत स्रोत ठरत असल्याचे चित्र आहे.
तुती लागवडीचे आवाहन
शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी किमान एक एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करावी, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाने केले आहे. नोंदणीसाठी 'आपले सरकार' पोर्टलचा वापर करता येतो किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधता येतो.
शासकीय योजनांचा बंपर लाभ
रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध योजनांद्वारे मोठे अनुदान दिले जात आहे:
मनरेगा योजनेअंतर्गत २०२५-२६ साठी प्रति एकरी ४.३२ रु. लाखांपर्यंत अनुदान
सिल्क समग्र योजना व पोकरा योजना अंतर्गत कीटक संगोपन गृह व आवश्यक साहित्याकरिता आर्थिक मदत
या योजनांमुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढीस मदत होत आहे.
रेशीम उद्योगातून चांगला नफा
जिल्ह्यातील अनेक शेतकरी वर्षाकाठी ४ ते ५ कीटक संगोपन बॅच घेत आहेत.
या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना वार्षिक १ लाख रुपयांहून अधिक निव्वळ नफा मिळत असल्याचे समोर आले आहे.
कमी जागेत, नियोजनबद्ध पद्धतीने आणि शासकीय मदतीच्या आधारावर हा उद्योग फायदेशीर ठरत आहे.
शाश्वत शेतीकडे वाटचाल
तुती लागवड आणि रेशीम उद्योगामुळे
नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होत आहे
ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती वाढते आहे
पारंपरिक शेतीवरील अवलंबित्व कमी होत आहे
यामुळे हिंगोली जिल्हा रेशीम उत्पादनाच्या दिशेने एक नवा आदर्श निर्माण करत आहे.
'महारेशीम अभियान'मुळे हिंगोलीत तुती लागवडीचा वेगाने विस्तार होत असून रेशीम उद्योग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय ठरत आहे. योग्य मार्गदर्शन, शासकीय मदत आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा उद्योग भविष्यात अधिक बळकट होण्याची चिन्हे आहेत.
अधिक वाचा : Palash tree benefits : 'पळस' दिसतो साधा, पण गुणधर्म ऐकून तुम्ही चकित व्हाल!
Web Summary : Hingoli farmers are embracing sericulture, boosted by the 'Maha रेशीम Abhiyan.' Mulberry cultivation expands across 454 acres, offering substantial income and reducing reliance on traditional farming with government support and good profits.
Web Summary : हिंगोली के किसान 'महा रेशम अभियान' द्वारा समर्थित रेशम उत्पादन को अपना रहे हैं। शहतूत की खेती 454 एकड़ में फैली हुई है, जिससे अच्छी आय हो रही है और सरकारी सहायता और अच्छे मुनाफे के साथ पारंपरिक खेती पर निर्भरता कम हो रही है।