Join us

व्यवसायासाठी कर्ज हवंय, चर्मोद्योग विकास महामंडळाकडे अर्ज करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 7:54 PM

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने 50 टक्के अनुदानाची योजना राबविण्यात येत आहे.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येतात. यापैकी 50% अनुदानाची योजना राबविण्यात येत आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजना लाभदायी ठरत आहेत. या योजनेविषयीची माहिती पाहूयात. 

काय आहे ही योजना या योजनेच्या माध्यमातून 50 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये अनुसूचित जातीतील व्यक्तींना राष्ट्रीयकृत बँकेमध्ये 50 हजार रुपये प्रकल्प असणाऱ्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सवलतीच्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जाच्या रकमेपैकी जास्तीत जास्त दहा हजार रुपये पर्यंत 50 टक्के रक्कम महामंडळाकडून अनुदान म्हणून दिले जाते. बाकीच्या 50 टक्के कर्जाची परतफेड 36 ते 60 महिन्याच्या समान हफत्यांत किंवा बँकेने ठरवून दिलेल्या हप्त्यात बँकेकडे करावी लागते.

लाभ घेण्यासाठी पात्रता काय?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदाराच्या वयाची 18 ते 50 वर्षे अशी आहे. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाची ज्ञान व अनुभव त्याला असावे.

कोणकोणती कागदपत्रे आवश्यक

या योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज, जातीचा दाखला, कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ग्रामपंचायत व तत्सम शासकीय कार्यालयांचे ना हरकत प्रमाणपत्र, रेशन कार्ड, अनुभवाचा दाखला. 

योजनेबाबत महत्वाचे....

या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून अधिक माहितीसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नाशिक येथे नाशिक जिल्ह्यातील अर्जदारांनी संपर्क साधावा.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीनाशिकशेतकरीसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय