Join us

Savkari Karj : सावकारांच्या मनमानीवर कारवाई; सूचना फलक नसेल तर परवाना रद्द वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 11:43 IST

Savkari Karj : अमरावतीत परवानाधारक सावकारांकडे व्याजदराचा सूचना फलक न लावल्याचा मुद्दा उघडकीस आल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. वाचा सविस्तर (Savkari Karj)

Savkari Karj : अमरावतीत परवानाधारक सावकारांकडे व्याजदराचा सूचना फलक न लावल्याचा मुद्दा उघडकीस आल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. (Savkari Karj)

डीडीआर शंकर कुंभार यांनी १३ तालुक्यांच्या सहायक निबंधकांना नोटीस बजावत सावकारांकडून नियमभंग होत असल्यास परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहर व ग्रामीण भागातील सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे.(Savkari Karj)

अमरावती जिल्ह्यातील एकाही परवानाधारक सावकाराकडे व्याजदर आकारणीचा सूचना फलक नसल्याचे वृत्त 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) शंकर कुंभार यांनी गंभीर दखल घेतली. (Savkari Karj)

याबाबत अमरावती तालुक्याचे उपनिबंधक व १३ तालुक्याचे सहायक निबंधक यांना गुरुवारी नोटीस बजावण्यात आली. शिवाय सावकाराकडे सूचना फलक नसल्यास परवाना रद्दचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत.(Savkari Karj)

जिल्ह्यात मार्च २०२४ पर्यंत ६३५ परवानाधारक सावकार अभिलेख्यावर आहेत. त्यापैकी ४६० सावकारांनी वर्ष २०२४-२५ करिता परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. (Savkari Karj)

यामध्ये परवान्याचे नूतनीकरण केलेल्या सावकारांच्या दुकान/प्रतिष्ठान/घर येथे प्रत्यक्ष भेट देऊन पावती पुस्तक क्र. १० व क्र.११, वार्षिक हिशोब पत्रके क्र. १४, पुंजी खाते वही, किर्द खातेवही याची तपासणी केल्याचा भेट अहवाल जीपीएस फोटोसह सादर केलेला नसल्याचे जिल्हा उपनिबंधक यांनी पत्रात नमूद केले आहे.

जिल्हा पथकाद्वारा तपासणी व भेटीवेळी सूचना फलक आढळून न आल्यास सदर सावकाराचा परवाना रद्द होईल. सूचना फलक, संबंधित एआर, सावकाराचे जीपीएस फोटो डीडीआर यांनी मागितले आहे.

तर संबंधित सहायक निबंधकांवर कारवाई

सावकारांनी व्यवसायाचे ठिकाणी सूचना फलक लावले की नाही, याचा उलट टपाली अहवाल डीडीआर यांनी मागितला आहे. 

व्याजदराचा सूचना फलक नसल्यास व सावकाराचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव एआर यांनी न पाठविल्यास शासकीय कामकाजात अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात येऊन प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.

आता शहरातील सावकारांवर कारवाईचा बडगा

ग्रामीणमधील सर्वच तालुक्यांत सावकाराचे व्यवसायाचे ठिकाणी व्याजदर नमूद असल्याचे सूचना फलक लागले आहेत. मात्र, अमरावती शहरातील काही सावकार मात्र, यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पथक परवानाधारक सावकाराचे प्रतिष्ठानला भेटी देणार आहे. तिथे सूचना फलक नसल्यास त्या सावकाराचा परवाना रद्दचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात येणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Savkari Karj : अमरावतीत सावकारांची मनमानी; शेतकऱ्यांना बसतोय अवैध व्याजाचा फटका वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक कर्जअमरावती