Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऊन वाढलंय! उष्माघात कसा टाळावा, काय उपाय करावेत, आहार कसा घ्यावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:25 IST

Heat Stroke : सध्या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा (Heat Stroke) धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

Heat Stroke : शेतकरी मित्रांनो, सध्या वाढत्या तापमानामुळेउष्माघाताचा (Heat Stroke) धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शेतात काम करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

जेव्हा शरीरातील तापमान नियंत्रित करणारी संस्था निकामी होते आणि शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअस (१०४ अंश फॉरनाईट) पेक्षा जास्त वाढते, तेव्हा त्या स्थितीला उष्माघात म्हणतात. हे अत्यंत घातक ठरू शकते, त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

कामाच्या वेळा बदला : दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक ऊन असते, त्यामुळे शक्यतो या काळात शेतात काम करणे टाळा. पहाटे लवकर किंवा संध्याकाळी उशिरा काम उरकून घ्या.पाण्याचे प्रमाण वाढवा : तहान लागलेली नसली तरीही थोड्या-थोड्या वेळाने पाणी पीत राहा. सोबत लिंबू सरबत, ताक किंवा ओआरएस (ORS) ठेवा जेणेकरून शरीरातील क्षारांचे प्रमाण टिकून राहील.संरक्षक कपडे वापरा : शेतात जाताना डोक्याला पांढरा रुमाल किंवा टोपी वापरा. शरीर पूर्ण झाकले जाईल असे सुती आणि सैल कपडे परिधान करा.विश्रांती घ्या : काम करताना थकवा जाणवल्यास त्वरित झाडाच्या सावलीत किंवा थंड ठिकाणी विश्रांती घ्या.

आहार प्रकार काय घ्यावे?

  • पेये ताक, पन्हे, शहाळे, वाळा घातलेले पाणी. शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स संतुलित राहतात.
  • फळे कलिंगड, संत्री, द्राक्षे, काकडी. यामध्ये पाण्याचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त असते.
  • भाज्या-दुधी भोपळा, पडवळ, कारले, कोबी. या भाज्या पचायला हलक्या आणि थंड असतात.
  • चहा-कॉफी, तळलेले पदार्थ, जास्त मीठ टाळावे. यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन "डिहायड्रेशन" होते.
  • कांदा : बाहेर जाताना खिशात एक छोटा कांदा ठेवणे हा जुना पण प्रभावी उपाय मानला जातो (तो उष्णता शोषून घेतो). तसेच जेवणात कच्च्या कांद्याचा वापर करावा.

वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. पुरेसे पाणी पिणे आणि डोके झाकून बाहेर पडणे हाथ उष्माघातापासून वाचण्याचा उत्तम उपाय आहे.-डॉ. नेहा बिलईमारे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वलनी,

English
हिंदी सारांश
Web Title : Beat the Heat: Prevention, Remedies, and Diet for Heatstroke

Web Summary : Protect yourself from heatstroke by avoiding midday work, staying hydrated with water, juices and ORS, wearing protective clothing, and resting in shade. Include cooling foods like watermelon, cucumber, and gourds in your diet. Carry an onion for heat absorption.
टॅग्स :उष्माघातशेती क्षेत्रतापमानशेती