Join us

Rabi Crop Advisory : अकोला कृषी विद्यापीठाने कृषी विभागाला दिले रब्बी लागवडीसंबंधी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 12:58 IST

Rabi Crop Advisory : यंदा पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे महाराष्ट्रात शेतजमीन व पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नागपूर व अमरावती विभागीय कृषी विभागाला येत्या रब्बी हंगामात लागवडीसाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. वाचा सविस्तर (Rabi Crop Advisory)

Rabi Crop Advisory : यंदा पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यामुळे महाराष्ट्रात शेतजमीन आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या रब्बी हंगामात पीक पेरणीचे योग्य नियोजन करण्यासाठी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील नागपूर व अमरावती विभागीय कृषी विभागाला काही विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. (Rabi Crop Advisory) 

या उपाययोजनांमध्ये हरभरा, जवस, मोहरी, तेलबिया, डाळवर्गीय पिकांची योग्य लागवड व रोग-किडी व्यवस्थापन यांचा समावेश आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन व नफा वाढवता येईल. (Rabi Crop Advisory) 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व शासनाच्या कृषी विभागाची विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समिती ही बैठक नुकतीच पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. शरद गडाख होते तर राज्याचे कृषी संचालक (विस्तार शिक्षण) रफीक नाईकवाडे, नागपूर व अमरावती विभागीय कृषी सहसंचालक आणि संबंधित कृषी विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.  (Rabi Crop Advisory) 

बैठकीत सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन येत्या रब्बी आणि उन्हाळी हंगामात कोणती पिके लावावीत, तसेच पीक लागवडीचे तंत्रज्ञान आणि विविध उपाययोजना ठरवण्यात आल्या. (Rabi Crop Advisory) 

विद्यापीठाने सुचविलेल्या उपाययोजना

कृषी विभागाला दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत

* हरभरा उत्पादन तंत्रज्ञान : हवामानानुसार योग्य लागवड व खत व्यवस्थापन

* जवस, मोहरी व कमी कालावधीत येणारी इतर पिके : जलद उत्पादनासाठी लागवड तंत्रज्ञान

* रब्बी पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन : जैविक व रासायनिक पद्धतींचा समन्वय

* फळपिके लागवड तंत्रज्ञान : योग्य अंतर, खत व्यवस्थापन व सिंचन

* तेलबिया व डाळवर्गीय पीक लागवड : उत्पादन सुधारण्यासाठी लागवड व खताचे मार्गदर्शन

महत्वाच्या बाबी

* यंदा नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य पीक पद्धती व तंत्रज्ञान उपलब्ध करणे

* पिकांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा सुनिश्चित करणे

* जलसाठा व हवामान परिस्थिती लक्षात घेऊन कमी कालावधीत उत्पादन मिळवणे

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* येत्या रब्बी हंगामात विद्यापीठाच्या उपाययोजना अवलंबाव्यात

* रोग व किडींचे व्यवस्थापन वेळेत करणे गरजेचे

* जलसाठा व सिंचनाची योग्य योजना आखणे

हे ही वाचा सविस्तर : Cotton Crop Management : कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव; नियंत्रणासाठी करा 'हा' उपाय

English
हिंदी सारांश
Web Title : Agricultural University suggests Rabi cultivation measures to the Agriculture Department.

Web Summary : Following crop damage from heavy rains, Akola Agricultural University suggested Rabi season cultivation measures. Focus includes short-duration crops and pest management techniques for Nagpur and Amravati divisions.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीरब्बी हंगाम