Join us

Rabbi Season Crop : रब्बी हंगामात 'ही' पिके ठरतील बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 18:43 IST

Rabbi Season Crop : अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात (Rabbi Season) कोणत्या पिकांची लागवड करावी, हे समजून घेऊया.. 

Rabbi Season Crop : रब्बी हंगाम सुरवात झाली असून शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीत व्यस्त आहेत. रब्बी हंगामात अनेक पिके घेतली जातात, त्यापैकी एक म्हणजे गहू, हरभरा ही महत्वाचे पिके मानली जातात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात (Rabbi Season) कोणत्या पिकांची लागवड करावी, हे समजून घेऊया.. 

शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील काही प्रमुख पिकांची (Crops) लागवड करावी. त्यात बटाटा, मसूर, गहू, मसूर, हरभरा, वाटाणा आणि मोहरी यांचा समावेश होतो. याशिवाय शेतकरी रब्बी हंगामात भाजीपाल्याची (Vegetable Crops) लागवड करू शकतात. रब्बी हंगामातील प्रमुख भाजीपाला पिकांबद्दल बोलायचे झाले तर  वांगी, भेंडी, बटाटा, कडधान्य, कारले, फ्लॉवर, कोबी, मुळा, गाजर, वाटाणा, बीटरूट, पालक या भाज्यांमुळे शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. 

ही पिके पेरागहू : गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. गहू पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी ऑक्टोबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पेरणी करावी. योग्य व्यवस्थापनातून या पिकातूचे चांगले उत्पादन होते.

हरभरा : रब्बी हंगामात पेरले जाणारे हरभरा हे अत्यंत महत्वाचे पीक आहे. शेतकऱ्यांनी 20 नोव्हेंबरपर्यंत हरभऱ्याची पेरणी करावी. तण नियंत्रणासाठी हरभरा पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी तण काढणे आवश्यक आहे. असे केल्याने उत्पादनात वाढ होते.

वाटाणा : मटारची पेरणी ऑक्टोबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत करावी. तणांच्या नियंत्रणासाठी मटार पेरणीनंतर २० दिवसांनी तण काढणे आवश्यक आहे. वाटाणा पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी पहिले पाणी द्यावे. पहिल्या सिंचनानंतर 6-7 दिवसांनी शेंगा दिसू लागल्यावर आवश्यकतेनुसार खुरपणी करावी.

मका : ज्या भागात सिंचनाची योग्य व्यवस्था आहे, त्या भागात मक्याची लागवड करावी. तेथे हिवाळी मक्याची पेरणी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. मक्याच्या पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी पहिले पाणी द्यावे.

जव : जव हे रब्बी हंगामात पेरलेल्या प्रमुख पिकांपैकी एक आहे. या पिकाची लागवड ज्या भागात योग्य सिंचन व्यवस्था आहे, त्या ठिकाणी करावी. अशा ठिकाणी जव पेरणी 15 नोव्हेंबरपर्यंत करावी. पेरणीपूर्वी तुमचे बियाणे प्रमाणित नसल्यास, पेरणीपूर्वी थिरम ॲझोटोबॅक्टरची प्रक्रिया करा. 

- कृषी विभाग महाराष्ट्र राज्य  

टॅग्स :गहूशेती क्षेत्रशेतीरब्बी