बबन इंगळे
नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी चेलका गाव नवा मार्ग दाखवत आहे. सहायक कृषी अधिकारी रवी बजर यांच्या मार्गदर्शनाखाली कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी, विषमुक्त शेती (Poison-free Farming) करणारी मॉडेल व्हिलेज म्हणून चेलक्याचा संपूर्ण राज्यात डंका वाजत आहे. (Poison-free Farming)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दत्तक योजनेतून येथे झालेले प्रशिक्षण व प्रयोग आज शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचं नवं उदाहरण ठरत आहे.(Poison-free Farming)
नैसर्गिक आपत्त्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखवत चेलका गावाने जिल्ह्यात पहिलं विषमुक्त मॉडेल व्हिलेज म्हणून नाव कमावलं आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या शेतीचा आदर्श उभा करून चेलका गावाचा आज राज्यभर गौरव होत आहे. या यशामागे सहायक कृषी अधिकारी रवी बजर यांचा मोलाचा वाटा आहे.(Poison-free Farming)
गेल्या दोन वर्षांपासून रवी बजर हे चेलक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, विषमुक्त शेती, पूरक व्यवसाय यासंदर्भात मार्गदर्शन करत आहेत. त्यामधून चेलक्यातील शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले. तसेच काही शेतकऱ्यांनी विषमुक्त फळबागा, मधमाशी पालन यांसारखे पूरक व्यवसाय सुरू केले.(Poison-free Farming)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हे गाव दत्तक घेतल्यानंतर येथे कार्यशाळा, प्रात्यक्षिके, पीक पाहणी व प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात आला. आज चेलक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.(Poison-free Farming)
चेलक्यातील विक्रमी उत्पादनांचा तपशील (क्विंटल/एकर)
हंगाम | पिकाचे नाव | उत्पादन (क्विंटल/एकर) |
---|---|---|
खरीप | सोयाबीन | १३ |
खरीप | हरभरा | १० |
खरीप | भुईमूग | ०८ |
रब्बी | गहू | ०५ |
उन्हाळी | मूग | १२५ |
उन्हाळी | तीळ | १९ |
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दररोज शेतकऱ्यांमध्ये वेळ घालवतो. माझे शिक्षण आणि अनुभव वापरून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे. - रवी बजर, सहायक कृषी अधिकारी, चेलका
शेतकऱ्यांचा अनुभव
कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा आणि पाणी फाउंडेशनच्या सहकार्यामुळे चेलका गावाचा चेहरामोहरा बदलला. आज आमचे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. - रामेश्वर उंडाळ, बँड ॲम्बेसेडर शेतकरी, चेलका