Join us
Daily Top 2Weekly Top 5

PMFME Scheme: 'पीएमएफएमई' योजनेत पाटणा अव्वल; संभाजीनगरची कामगिरी का घसरली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:13 IST

PMFME Scheme : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेत सलग चार वर्षे देशात अव्वल राहिलेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा यंदा दुसऱ्या स्थानी घसरला आहे. पाटणा जिल्ह्याने तब्बल २,३९२ उद्योग उभारून पहिल्या स्थानावर झेप घेतली असून, संभाजीनगरचा १०१ उद्योगांवरच अडलेला वेग चर्चेत आला आहे. (PMFME Scheme)

बापू सोळुंके 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेत सलग चार वर्षे देशात अव्वल असलेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा यंदा दुसऱ्या स्थानी घसरला आहे. (PMFME Scheme)

'पीएमएफएमई' योजनेत बिहारची राजधानी पाटणा जिल्हा देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. योजनेची सुरुवात २०२१- २२ पासून झाली असून, त्यानंतर प्रथमच संभाजीनगरला आपली आघाडी सोडावी लागली आहे.(PMFME Scheme)

'एक जिल्हा – एक पीक' पासून योजनेचा वेग

PMFME योजना 2021-22 मध्ये ‘एक जिल्हा – एक पीक’ या संकल्पनेतून सुरू झाली.

संभाजीनगर जिल्ह्यासाठी मका (Maize) हे पीक निवडण्यात आले

मक्याच्या सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली

यानंतर केंद्र सरकारने 'एक जिल्हा एक पीक' ही सक्तीची अट रद्द केली. त्यानंतर योजनेचा विस्तार वाढला आणि संभाजीनगरने सलग चार वर्षे देशात पहिल्या क्रमांकावर आपली छाप कायम ठेवली.

यंदाची घसरण : फक्त १०१ उद्योग उभारणी

२०२५-२६ साठी जिल्ह्याला ६०३ उद्योग उभारण्याचे उद्दिष्ट दिले गेले होते.

उभारलेले उद्योग : १०१

बाकी प्रलंबित : सुमारे ५०० पेक्षा अधिक

बँकांकडे प्रलंबित प्रस्ताव : २०० प्रकल्प

यामुळे पहिल्या स्थानावरून संभाजीनगर जिल्हा दुसऱ्या स्थानावर सरकला आहे.

पाटण्याची झेप : तब्बल २,३९२ सूक्ष्म उद्योग

पाटणा जिल्ह्याने PMFME योजनेत मोठी झेप घेतली आहे.

पाटण्यात उभारलेले उद्योग : २,३९२यातील ९९% प्रकल्प 'मखाना' प्रक्रिया उद्योगाचे आहेत.

यामागे केंद्र सरकारने बिहारमध्ये सुरू केलेल्या मखाना बोर्डचे मोठे योगदान असल्याचे मानले जात आहे.

संभाजीनगरची आकडेवारी (वर्षनिहाय कामगिरी)

वर्षउद्दिष्टसाध्यदेशातील स्थान
२०२१-२२८२१०७प्रथम
२०२२-२३२२२७६१प्रथम
२०२३-२४६२५७६६प्रथम
२०२४-२५६०३३२३प्रथम
२०२५-२६६०३१०१द्वितीय

एकूण प्रकल्प (सुरुवातीपासून आतापर्यंत)

पाटणा : २,३९२ उद्योग

छत्रपती संभाजीनगर : २,२६० उद्योग

बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केल्यानंतर मखाना प्रक्रिया उद्योगांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तेथील बहुतेक प्रकल्प एकाच पिकावर केंद्रित आहेत. आपल्या जिल्ह्यात प्रकल्प विविध अन्नप्रक्रिया क्षेत्रांमध्ये विभागलेले असल्याने प्रगतीचा वेग तुलनेत कमी दिसतो. जिल्ह्यातील २०० प्रस्ताव बँकांत प्रलंबित असून, पहिल्या स्थानासाठी प्रयत्न सुरू आहेत.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

देशातील टॉप-५ जिल्हे 

पाटणा (बिहार)

छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)

शिमला (हिमाचल प्रदेश)

सांगली (महाराष्ट्र)

अहिल्यानगर (महाराष्ट्र)

महाराष्ट्रातील तीन जिल्हे टॉप ५ मध्ये असल्याने राज्याची एकूण कामगिरी देशात उल्लेखनीय आहे.

छत्रपती संभाजीनगरसाठी पुढील आव्हाने

प्रलंबित प्रकल्पांना तातडीने बँक मंजुरी

उद्योग प्रशिक्षण व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन

विविध उद्योगक्षेत्रांतील गुंतवणूक वाढवणे

जिल्ह्याला परत पहिल्या क्रमांकावर नेणे

हे ही वाचा सविस्तर : Mahabeej Organic Seeds :'महाबीज'ची सेंद्रिय शेतीत एंट्री; शेतकऱ्यांसाठी प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा

English
हिंदी सारांश
Web Title : Patna Overtakes Sambhajinagar in Micro Food Processing Industry Scheme

Web Summary : Patna, Bihar, leads in PMFME scheme, surpassing Chhatrapati Sambhajinagar, which held the top spot for four years. Patna has 2,392 units against Sambhajinagar's 2,260. Mखाना projects in Bihar are driving the growth. Sangli and Ahilyanagar are also top performers.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजना