Join us

Suryghar Yojana : घरगुती सोलरच्या रिडींगमध्ये त्रुटी, वीजबिलात वाढ, कनेक्शन बंद करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 16:09 IST

Suryghar Yojana : सौरऊर्जा (सोलर) ग्राहकांच्या दर महिन्याच्या बिलात रीडिंगमधील त्रुटींमुळे वाढ झाली असून, त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे.

जळगाव : सौरऊर्जा (सोलर) ग्राहकांच्या दर महिन्याच्या बिलात रीडिंगमधील त्रुटींमुळे वाढ झाली असून, त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तसेच, जुलै महिन्यापासून २० केडब्ल्यूपेक्षा अधिक वीज भाराच्या घरगुतीशिवाय इतर ग्राहकांना बिलाचा केव्हीएएच पॅटर्न लागू झाल्याने त्यांच्याही विजेवरील खर्चात वाढ झाली आहे.

महावितरण काय म्हणते...सोलर ग्राहकांच्या बिलांच्या संदर्भात तक्रारी आहेत. त्यांची समस्या निकाली काढण्यावर काम सुरू आहे. तसेच राज्य वीज नियामक आयोग (एमईआरसी) यांच्या आदेशानुसार, २० केडब्ल्यूपेक्षा अधिक वीज भार मंजूर असलेल्या ग्राहकांना केव्हीएएच पॅटर्न जुलै २०२५ पासून लागू करण्यात आला आहे. या ग्राहकांनी वीज वापर कार्यक्षमपणे होण्यासाठी, दंड टाळण्यासाठी योग्य क्षमतेचे कपॅसिटर युनिट लावून योग्य पॉवर फॅक्टर मेंटेन करणे आवश्यक आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कनेक्शन बंद करण्याचा इशारा...चुकलेले बिल न भरल्याने ग्राहकांच्या अनामत रकमा महावितरणने वर्ग करून घेतल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या आहेत. अशी बिले न भरल्यास कनेक्शन बंद करण्याचा इशारा महावितरणकडून दिला जात आहे.

जळगावात सोलर पॅनेल बसवलेल्या ग्राहकांकडे मीटर बसविण्यासाठी, रीडिंग घेण्यासाठी एजन्सी नियुक्त आहे. त्यांच्यात व महावितरणमध्ये समन्वय नसल्याचा आर्थिक फटका ग्राहकांना बसत आहे.- सचिन गाडगीळ, प्रतिनिधी, सोलर असोसिएशन, जळगाव

या ग्राहकांनाही फटका...२० केडब्लूपेक्षा अधिक वीज भार मंजूर असलेल्या घरगुतीशिवाय इतर १ ग्राहकांच्या बिलातही वाढ झाली आहे. त्यांना बिलाचा केव्हीएएच पॅटर्न लागू झाला आहे. औद्योगिक ग्राहकांना ही व्यवस्था याआधीपासून लागू होती, आता ती इतर ग्राहकांनाही लागू केली गेली आहे. वीज किती कार्यक्षमपणे वापरली २ याचे मोजमाप केडब्ल्यूएच ऐवजी केव्हीएएचमध्ये सुरू झाले आहे. 

यानंतर शहरातील एका डॉक्टरांना ८० हजार रुपयांचे बिल आले आहे. वीज कार्यक्षमपणे वापरली ३ जाण्यासाठी २० केडब्ल्यूवरील बिगर घरगुती ग्राहकांना ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर युनिट / कपॅसिटर बसवावे लागणार आहे. विजेचे रीडिंग व्यवस्थित घेतले न जाणे, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट युनिटची नोंद बिलात न होणे, सोलरद्वारे तयार झालेल्या विजेचे युनिट बिलातून कमी न होणे आदी तक्रारी ग्राहक करत आहेत. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीभारनियमन