Join us

सिन्नर तालुक्यातील बारा गावांत 15 हजार वनौषधींची लागवड, वन विभागाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 3:47 PM

विविध 10 प्रजातीच्या 14 हजार दुर्मीळ वनौषधी बियाणांचे वन विभागाकडून संकलन करण्यात आले आहे.

नाशिक : विविध 10 प्रजातीच्या 14 हजार दुर्मीळ वनौषधी बियाणांचे वन विभागाकडून संकलन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील १२ गावांतील जंगल परिसरात त्याचे रोपण करून जैवविविधता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर अशा ५० हून अधिक कर्मबान्यांनी त्यासाठी मेहनत घेतली. 

एकीकडे ऊन वाढत असून दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.  अशा स्थितीत झाडाची लागवड होणे गरजेचे आहे, शिवाय त्या झाडांचे संगोपन देखील भविष्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सिन्नरवनविभागाने वनौषधी झाडांची लागवड करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. सिन्नर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेत 15 हजार बियाणांचे संकलन केले आहे. पावसाळ्यापर्यंत अजूनही आणखी बिया संकलित केल्या जाणार आहेत.

सिन्नर तालुक्यातील विविध गावांतील जंगल, परसबाग, शेत, डोंगरातील दऱ्यात दिसणाऱ्या दुर्मीळ वनौषधी बिया संकलित करण्यात आल्या. किमान २० किलो (१५ हजार बिया) बियाणांचे संकलन पूर्ण झाले. आगामी काळातही बिया संकलित केल्या जाणार आहेत. तसेच संकलित करण्यात आलेल्या या वनौषधी बियाणांची उगवण क्षमताही तपासण्यात आली आहे. त्यात चांगला परिणाम आढळून आला आहे. तालुक्यातील दापूर, धुळवाड, कासारवाडी, चास, नळवाडी, देशवंडी, जामगाव, शिवडे, सोनांबे, कोनांबे, ठाणगाव, हिवरे या गावांच्या परिसरातील जंगलात बियाणांचे रोपण करण्यात येणार आहे. 

लागवडीतून जैवविविधतेत वाढ होण्यास मदत 

दरम्यान तांत्रिकदृष्ट्या कोणत्या झाडांची वाढ कोठे होते, याची माहिती वनमंजुरांना देऊन त्याचे रोपण होणार आहे. जांभुळ, अर्जुन ही झाडे वनतळे, पाणवठवांची ठिकाणी वाढतात, तर वणवा लागलेल्य ठिकाणी करंज, कांचन यांच्या बियांचे रोपण केले जाणार आहे. वनौषधींच्या बिया संकलित करण्यात आल्या. किमान २० किलो (१५ हजार बिया) बियाणांचे संकलन पूर्ण झाले. पावसाळ्यात बियांचे रोपण झाल्यानंतर त्याचा भविष्यात चांगला परिणाम समोर येईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा जाध्व यांनी दिली. जैवविविधतामध्ये यातून वाढ होणार आहे. या उपक्रमाची व्यापकता अधिक वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे.

टॅग्स :शेतीनाशिकइनडोअर प्लाण्ट्ससिन्नरवनविभाग