Join us

नव्या योजनेत विमा नुकसान भरपाई कशी निश्चित केली जाणार, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:35 IST

Pik Vima Yojana : नव्या पीक विमा योजनेत विमा नुकसान भरपाई कशाच्या आधारावर निश्चित केली जाणार, हे पाहुयात....

Pik Vima Yojana :   खरीप 2025 च्या हंगामात उत्पादन आधारित नुकसान भरपाई (Nuksan Bharpai) निश्चित करताना महसूल मंडल/तालुक्यात पिक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यांस सुत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते. 

सरासरी उत्पादन काढताना कापूस, सोयाबीन, भात या निवडक पिकाचे बाबतीत रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानद्वारे प्राप्त उत्पादनास 50 टक्के आणि पीक कापणी द्वारे प्राप्त उत्पादनास 50 टक्के भारांकन देऊन पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे. उर्वरित पिकांचे बाबतीत पिक कापणी द्वारे प्राप्त उत्पादन गृहीत धरले जाणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही शासनाने निर्धारित केलेल्या विमा क्षेत्र घटकातील (इन्शुरन्स युनिट) पीक कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या उत्पन्नाच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल.

जर एखाद्या निर्धारित क्षेत्रातील विमा संरक्षित पिकाचे त्यावर्षीचे दर हेक्टरी सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे गृहीत धरण्यात येईल.

एका विमा घटकातील उंबरठा उत्पादन किंवा हमी उत्पादन हे सर्व पिकांसाठी त्या हंगामातील मागील 7 वर्षापैकी सर्वोत्तम अशा 5 वर्षाचे सरासरी उत्पादन X जोखीमस्तर असेल. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या वर्षांकरिता 70 टक्के असा जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे.

उंबरठा उत्पादन =     हंगामातील मागील 7 वर्षापैकी सर्वोत्तम

अशा 5 वर्षाचे सरासरी उत्पादन X 70 टक्के (जोखिमस्तर)

नुकसान भरपाई ठरविण्याचे सूत्र रु. प्रती हे.:

नुकसान भरपाई   रु/हे = उंबरठा उत्पादन -चालू वर्षाचे सरासरी उत्पादन

____________________________________X विमा संरक्षित रक्कम (रु. प्रति हे.)

उंबरठा उत्पादन

टॅग्स :पीक विमाशेतीशेती क्षेत्रकृषी योजना