Join us

Navin Pik Vima Yojana : नवीन पिक विमा योजनेनुसार प्रतिहेक्टर किती विमा हप्ता भरावा लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:15 IST

Navin Pik Vima Yojana : सुधारित पीक योजनेला (Crop Insurance Scheme) मान्यता देण्यात आली असून विमा 1 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे.

Navin Pik Vima Yojana : सुधारित पीक योजनेला मान्यता देण्यात आली असून विमा 1 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. शेतकरी बांधवांनी वेळेत विमा भरून आपली पिके सुरक्षित करावीत. या योजनेत कोणत्या पिकांचा समावेश आहे. तसेच प्रतिहेक्टर किती विमा हप्ता भरावा लागेल? हे पाहुयात... 

योजनेत समाविष्ट पिके व शेतकरी :या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल. सदर योजना राज्यात शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ / मंडळगट किंवा तालुकास्तरावर खालील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येईल.

        पीक वर्गवारीखरीप हंगामरब्बी हंगाम 
तृणधान्य व कडधान्य पिकेभात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मूग, उडीद, तूर, मकागहू (बागायत), रबी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात 
गळीत धान्य पिकेभुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीनउन्हाळी भुईमूग.  
नगदी पिकेकापूस, खरीप कांदारब्बी कांदा 

राज्यात अधिसूचित क्षेत्रासाठी खरीप हंगामातील भात (धान) व उन्हाळी भात पीक अधिसूचित करण्यात आले असून, यासाठी उंबरठा उत्पादन व चालू वर्षाचे सरासरी उत्पादन हे तांदुळ गृहित धरुन निश्चित केले आहे.

पीकनिहाय विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान : या योजनेअंतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारण्यात येईल. तथापि, खरीप व रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी विमा हप्ता दर खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.               पिके                       शेतकरी हिस्सा विमा हप्ता     शेतकरी हिस्सा विमा हप्ता
  खरीप हंगाम                रब्बी हंगाम  
१ अन्नधान्य व गळीत धान्य पिकेविमा संरक्षीत रक्कमेच्या २ टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते.विमा संरक्षीत रक्कमेच्या १.५ टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते.
२ नगदी पिके (कापूस व कांदा)विमा संरक्षीत रक्कमेच्या ५ टक्के किवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते.

विमा संरक्षीत रक्कमेच्या ५ टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सन २०२५-२६ पासून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के, तसेच, खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. योजनेच्या केंद्र शासनाच्या दिनांक ०६ नाव्हेंबर, २०२४ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विमा हप्ता दरातील शेतकरी हिस्सा वजा जाता उर्वरित रक्कम ही राज्य व केंद्र शासनामार्फत, विमा हप्ता अनुदानाच्या केंद्र हिस्स्याला मर्यादा नुसार दिली जाईल. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनूसार केंद्र शासन कोरडवाहू जिल्ह्यातील पिकांना ३० टक्के व बागायती जिल्ह्यातील पिकांना २५ टक्केच्या मर्यादेत त्यांचा समप्रमाणातील हिस्सा अदा करणार आहे.

Navin Pik Vima Yojana : राज्यात आता सुधारित पीक विमा योजना, पहा काय-काय बदल झालेत?

टॅग्स :पीक विमाकृषी योजनाशेतीखरीप