Join us

Pik Vima Yojana: शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक? किरकोळ कारणांनी पीकविमा नाकारला वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 10:54 IST

Pik Vima yojana : मागील वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने फुलंब्री तालुक्यातील शेतकरी आधीच पुरता त्रस्त होता. पीक हातचं गेलं, नुकसान मोठं झालं… तरीही आशेचा एकच आधार होता पीकविमा (Kharif Crop Insurance). पण या आशेलाही जबर धक्का बसला आहे. काय आहे प्रकरण ते वाचा सविस्तर. (Pik Vima Yojana)

रऊफ शेख

मागील वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने फुलंब्री तालुक्यातील शेतकरी आधीच पुरता त्रस्त होता. पीक हातचं गेलं, नुकसान मोठं झालं… तरीही आशेचा एकच आधार होता पीकविमा (Kharif Crop Insurance) . पण या आशेलाही जबर धक्का बसला आहे. (Pik Vima Yojana)

तब्बल ६३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन (Online) तक्रारी नोंदवल्या असताना, ३० हजार शेतकऱ्यांचे अर्ज किरकोळ कारणांनी फेटाळून (Rejected) लावले गेले.

फक्त काही हजार शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झाली, उर्वरित अजूनही प्रतीक्षेत आहेत. विमा योजनेत पारदर्शकता नसल्याचा स्पष्ट आरोप होत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची विश्वास हरवतो आहे. (Pik Vima Yojana)

पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले असतानाही चुकीच्या पिकाची निवड करणे, पाऊस पडलेला नसताना आणि दुबार अर्ज करणे या किरकोळ कारणावरून तालुक्यातील ३० हजार शेतकऱ्यांना खरीप पिकाचा विमा कंपनीकडून नाकारण्यात आला आहे.

तर दुसरीकडे वर्षभरात ६३ हजारपैकी केवळ ९ हजार शेतकऱ्यांच्या पदरात विम्याची रक्कम पडलेली आहे. त्यामुळे यंदा विमा (Pik Vima Yojana) काढण्यास शेतकरी उदासीन आहेत.

२० ऑक्टोबर २०२४ रोजी तालुक्यात १२ तास सतत पाऊस पडला होता. यामुळे शेतात सोंगून ठेवलेला मका भिजून पिकात पाणी साचले होते. कपशीला फुटलेली बोंडे भिजून गळून पडली. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. (Kharif Crop Insurance)

यात कपाशी, मका, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. त्यानंतर तालुक्यातील ६३ हजार शेतकऱ्यांनी चोलामंडळ विमा कंपनीकडे पीक नुकसानीबाबत ऑनलाइन तक्रार नोंदविली होती. पण कंपनीने या तक्रारीचे गांभीर्य घेतले नाही. (Kharif Crop Insurance)

तसेच कृषी विभागाच्या वतीने वारंवार कंपनीकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी पुन्हा सर्वेक्षण करून ६३ हजार पैकी ३२ हजार ६६२ शेतकऱ्यांना विमा देण्याचे जाहीर केले होते. (Kharif Crop Insurance)

परंतु ३० हजार शेतकऱ्यांना विमा देण्यास कंपनीने नकार दिला. जाहीर केलेल्या ३२ हजारपैकी आतापर्यंत केवळ ९ हजार ६२९ शेतकऱ्यांच्याच विमा पदरात पडला असून उर्वरित २३ हजार शेतकरी ८ महिन्यांपासून विम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.

पण प्रत्यक्षात... केवळ ९ हजारांनाच मिळाला लाभ

घोषणेनंतरही प्रत्यक्षात फक्त ९,६२९ शेतकऱ्यांच्याच खात्यात विम्याची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित २३ हजार शेतकरी तब्बल ८ महिन्यांपासून वाट बघत आहेत.

३० हजार शेतकऱ्यांना किरकोळ कारणांवरून नकार

* चुकीचे पीक निवडणे

*पाऊस नसताना अर्ज करणे

* दुबार अर्ज

* विमा नाकारण्यात आलेल्या ३० हजार शेतकऱ्यांना कंपनीने अशी किरकोळ कारणे दाखवली अन् पीक विमा नाकारला.

तालुक्यातील ६३ हजार शेतकऱ्यांनी २०२४ मध्ये विमा काढला. त्या खरीप पिकांचे नुकसान झालेले असल्याची ऑनलाइन तक्रार विमा कंपनीकडे केली होती. यासंदर्भात कंपनीच्या विभागीय अधिकाऱ्यांसोबत सतत संपर्क साधून त्यांना याद्या पुरविण्याची मागणी केली होती; परंतु त्यांनी अजूनही याद्या दिलेल्या नाहीत. - भारत कासार, तालुका कृषी अधिकारी, फुलंब्री

हे ही वाचा सविस्तर : Pik Vima: शासनाच्या एक रुपयात पीक विमा योजनेचे वास्तव जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रपीक विमापीकखरीपशेतकरीशेती