Join us

Pik Vima Yojana : नव्या पीक विमा योजनेत बिगर कर्जदार शेतकरी सहभागी होऊ शकतात का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:33 IST

Pik Vima Yojana : सुधारित पीक विमा योजनेत बिगर कर्जदार शेतकरी अर्ज करू शकतात का? असेल ते कसे?

Pik Vima Yojana : नव्या पीक विमा योजनेत सहभागी होऊ इच्छिणारे बिगर कर्जदार शेतकरी आपल्या विमा प्रस्तावाची आवेदन पत्रे भरून व्यापारी बँकांच्या स्थानिक शाखेत / प्रादेशिक ग्रामीण बँकेत / प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी संस्था/आपले सरकार सेवा केंद्र/ विमा कंपनीच्या अधिकृत विमा प्रतिनिधी किंवा विमा मध्यस्थामार्फत विमा हप्ता रकमेसह सादर करतील.

योजनेत सहभागी होणारा शेतकरी विहित प्रपत्रातील विमा प्रस्ताव भरून व्यापारी बँकेच्या शाखेत/प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या शाखेत / प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी संस्थेत विमा हप्ता भरुन सादर करेल, संबंधीत शेतकऱ्यांना संबंधित बँकेत आपले बचत खाते उघडणे आवश्यक राहील. बँकेतील अधिकारी, शेतकऱ्यांना आवेदनपत्रे भरणे व इतर बाबतीत सहाय्य व मार्गदर्शन करतील. 

शेतकऱ्याचे विमा प्रस्ताव स्विकारताना त्यांनी विमा संरक्षित केलेली रक्कम व लागू होणारी विमा हप्ता रक्कम इत्यादी बाबी तपासून पाहण्याची जबाबदारी संबंधित बँकांची राहिल. बँकेची शाखा पीकवार व विहित प्रपत्रामधील पीक विमा प्रस्ताव / घोषणापत्र तयार करून विमा हप्ता रक्कमेसह अमंलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना विहित कालावधीत पाठवेल.

१५. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने व संबंधित विमा कंपनीने मान्यता दिलेल्या संस्था, विमा कंपनीने नियुक्त केलेले प्रतिनिधी शेतकऱ्याकडून विमा हप्ता स्विकारते वेळी शेतकऱ्यांचे पीकाखालील क्षेत्र, विमा संरक्षित रक्कम इत्यादी बाबत संबंधीत भुमि अभिलेख दस्तऐवज तपासून पाहतील, त्याचप्रमाणे भाडेतत्वावर किंवा कुळाने असलेल्या शेतकऱ्यांच्या करारनामा / सहमती पत्राची प्रत अभिलेखात जतन करतील. 

प्राधिकृत केलेल्या संस्था/ विमा प्रतिनिधी जमा झालेल्या विमा हप्त्याची  रक्कम व संकलित प्रस्ताव ७ दिवसात विमा कंपनीस पाठवतील. अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचे बँक खाते असल्याबाबतची खातरजमा करतील व याचा तपशील विमा कंपनीस पाठवतील.

बिगर-कर्जदार शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग थेट विमा कंपनी मार्फत:-शासनाने प्राधिकृत केलेल्या पीक विमा संकेतस्थळाद्वारे किंवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे देखील बिगर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. उपरोक्त पध्दतीने योजनेत सहभागी होणाऱ्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांजवळ योजनेत सहभागी झाल्याचा पुरावा उदा. अर्जाची झेरॉक्स किंवा विमा हप्ता भरल्याची पावती असणे बंधनकारक आहे. 

विमा प्रस्तावात भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांचा विमा हप्ता जप्त केला जाईल व शेतकऱ्यांस नुकसान भरपाई मिळणेचा अधिकार राहणार नाही. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी सादर केलेला विमा प्रस्ताव अपूर्ण असल्यास / आवश्यक असणारे पुरावे व कागदपत्रे प्रस्तावासोबत सादर न केल्यास योग्य तो विमा हप्ता भरलेला नसल्यास प्रस्ताव स्विकारल्यापासून १ महिन्याच्या आत सदर प्रस्ताव परत करण्याचे अधिकार विमा कंपनीस आहेत. विमा कंपनीने प्रस्ताव नाकारल्यास विमा हप्त्याची संपूर्ण रक्कम संबंधित शेतकऱ्याला विमा कंपनीमार्फत परत दिली जाईल.

टॅग्स :पीक विमाशेती क्षेत्रकृषी योजनाशेती