Join us

MBA, BCA CET : शेताच्या बांधावरून करा MBA, वाचा संपूर्ण प्रवेश परीक्षा वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 18:48 IST

Nashik : मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) एम.बी. ए. (MBA) आणि बी.सी.ए. (BCA) ऑनलाईन प्रवेश अर्जास मुदतवाढ देण्यात आली आहे.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शेक्षणिक वर्ष 2024-25 करिता एम.बी. ए. (MBA) आणि बी.सी.ए. (BCA) शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षाचे ऑनलाईन प्रवेश अर्जास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुक विद्यार्थ्यांना 5 ऑगस्ट पर्यंत या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करता येणार आहे.  यासाठी विद्यापीठाचे संकेतस्थळ 24 तास उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा अंतर्गत ही प्रवेश परीक्षा होत आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना दिनांक 01 जुलै पासून ते 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. मात्र आता यात वाढ करण्यात येऊन 05 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. सदर शिक्षणक्रमाच्या प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, याकरीता प्रवेश परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी प्रथम खालील सूचनांचे अवलोकन करावे. एम.बी.ए. आणि बी.सी.ए. शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रथम प्रवेश परीक्षा (Entrance Examination) देणे  बंधनकारक असून या प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील. 

याकरिता https://ycmapp.ycmou.org.in/login या लिंकवर जाऊन ऑनलाईन प्रवेश परीक्षेकरिता प्रथमत: Register Here व्दारे नोंदणी करता येईल.

प्रवेश शुल्क आणि इतर माहिती 

प्रवेश शुल्क - एम.बी.ए. MBA - प्रवेश परीक्षा शुल्क : रू. 600/- आणि  बी.सी.ए BCA - प्रवेश परीक्षा शुल्क: रू. 500/-एम. बी. ए  आणि बी.सी.ए. प्रवेशाकरिता तसेच माहिती पुस्तिक खालील लिंक मध्ये सर्व माहिती दिलेली आहे.- https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1439  प्रवेश परीक्षेत नोंदणी केल्यानंतर उमेदवारास सराव परीक्षा (Demo/Mock Test) उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर प्रवेश परीक्षा (Entrance Test) देता येईल.  प्रवेश परीक्षा नोंदणी कालावधी : दि. 01 जुलै 2024 पासून 13 जुलै 2024 पर्यंत (24 तास लिंक उपलब्ध) आहे.     या परीक्षेसंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास या हेल्पलाईन नंबर वर (8055253072, 7447457194) संपर्क करावा, तसेच पेमेंट संदर्भात ycmou_support@unisuite.in या मेलवर संपर्क करावा. वरील दोन्ही प्रवेश परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी केले 

टॅग्स :नाशिकशेती क्षेत्रशेतीविद्यापीठ