Join us

पाणी मागणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन, शेतकऱ्यांना 14 जानेवारीपर्यंत मुदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 5:47 PM

मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांसाठी पाणी मागणी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नाशिक जिल्ह्यात यंदा पाऊसमान कमी असल्याने खरिपासह रब्बी पिकांवर देखील परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच शेतीसाठी गंगापूर धरणाच्या कालव्यातून पाणी आवर्तन करण्यात आले होते. त्यानंतर  आता मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांसाठी पाणी मागणी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

एकीकडे यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती अनुभवयास मिळत आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना सुरवातीपासून देण्यात आलेल्या आहेत. पुरेसा पाणीसाठा नसल्याने शेतकऱ्यांची परवड होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव पाटबंधारे विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील पाटबंधारे उपविभाग सटाणा अंतर्गत असलेले लघु प्रकल्प पठावे, दसाणे, जोखाड यांचे जलाशय व नदीवरील मंजूर उपसा सिंचन व कालवा प्रवाही तसेच कालव्यावरील मंजुर उपसा सिंचनद्वारे पाणी पुरवठा करणेसाठी शेतकऱ्यांनी 14 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत असे आवाहन कार्यकारी अभियंता, मालेगाव पाटबंधारे विभातील अधिकारी डोके यांनी केले आहे.

उपलब्ध पाण्यातून सिंचनासाठी आवर्तन 

रब्बी हंगाम 2023-24 मध्ये पिण्यासाठी आरक्षित पाण्या व्यतिरिक्त उपलब्ध पाण्यातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन देण्याचे नियोजन संबंधित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. संबंधित लघु प्रकल्पांमधील सिंचनासाठी उपलब्ध होणारा पाणीसाठा विचारात घेवून रब्बी हंगामात पेरणी झालेली पिके व उभ्या पिकांना हंगामी पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यानुसार करण्यात येणारा पाणीपुरवठा हा महाराष्ट्र शासन सिंचन कायदा सन 1976 व महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे व्यवस्थापन कायदा 2005 यातील तरतुदी व प्रचलित शासन  धोरण तसेच शासनातर्फे वेळोवेळी काढण्यात येणारे शासन निर्णय यांच्या आधीन राहून करण्यात येणार आहे. नमुना नं 7 कोरे पाणी अर्ज शाखेत विनामूल्य उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी पाणी अर्ज संबंधित शाखेत विहित मुदतीत भरून द्यावेत, असेही कार्यकारी अभियंता, मालेगाव पाटबंधारे विभाग म.नं डोके यांनी कळविले आहे. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिकगंगापूर धरणपाणीमालेगांव