नाशिक : उन्हाळी वाळवणासाठी पौष्टिक अशी नागलीचे (नाचणी) पापड बनवण्यासाठी नवीन नागली बाजारात दाखल झाली असून, या लालभडक नागली खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी वाढू लागली आहे.
गतवर्षी पेक्षा नागलीचे दर पायली मागे ५० रुपयांनी वाढले आहेत. कॅल्शियम आणि लोहयुक्त या आरोग्यदायी या नागलीच्या पापड बनवण्यासाठी नागलीला विशेष महत्त्व आहे.
बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील वाघंबा, मानूर, साल्हेर मुल्हेर वाठोडा, वर्गीपाडा, भिकार सोंडा, पायरपाडा या भागांतील आदिवासी बांधव शहरातील मुख्य ठिकाणी किंवा आठवडे बाजारात नागली विक्रीसाठी येत आहे. हे पापड महिला सामुदायिकरीत्या बनविण्यासाठी एकत्र येतात. नागलीचे पापड पौष्टिक असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात पापड बनविले जातात.
गतवर्षी बाजारात ३०० ते ३५० रुपये असलेली पायली यंदा ३६० ते ४०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. नागलीचे पापड खाण्यास चविष्ट लागतो. नागली आरोग्यासाठी लाभदायक असते, असे गृहिणी चित्रा शेलार यांनी सांगितले.
मधुमेही व्यक्तींना रोज नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण, त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल ही नागलीमुळे नियंत्रणात राहायला मदत होते. नागली प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. त्यामुळे नाचणीच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही आहारात घेऊ शकता. नाचणी खाल्ल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते म्हणून ज्याला रक्ताची कमतरता आहे, अशांनी रोज नागलीची भाकरी खायला हवी.- डॉ. मनीष ढोले, सटाणा
Web Summary : Red finger millet arrives in Nashik markets, popular for papad making. Prices increased due to high calcium and iron content. Beneficial for diabetics, cholesterol, and immunity. Doctors recommend it for blood deficiency.
Web Summary : नाशिक के बाज़ारों में लाल रागी आई, जो पापड़ बनाने के लिए लोकप्रिय है। कैल्शियम और आयरन की मात्रा अधिक होने के कारण कीमतें बढ़ीं। मधुमेह, कोलेस्ट्रॉल और प्रतिरक्षा के लिए फायदेमंद। डॉक्टर इसे खून की कमी के लिए सलाह देते हैं।