NAFED Soybean Kharedi :सोयाबीनच्या हमीभावावर खरेदीसाठी नाफेडमार्फत सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणीस आता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (NAFED Soybean Kharedi)
खासगी बाजारात सोयाबीनचे दर शासनमान्य दरापेक्षा तब्बल ८०० ते १ हजार रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणावर नाफेडच्या केंद्रांकडे वळला आहे. (NAFED Soybean Kharedi)
या पार्श्वभूमीवर नोंदणी मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी प्रत्यक्ष खरेदीची गती अत्यंत संथ असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.(NAFED Soybean Kharedi)
सध्या खासगी बाजारात सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून, नाफेडमार्फत हमीभावाने ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गर्दी नाफेडच्या केंद्रांवर दिसून येत आहे.
सुरुवातीला ३१ डिसेंबरपर्यंत असलेली नोंदणी मुदत शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत 'डीएमओ' यांनी आता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत वाढविल्याची माहिती दिली.
केंद्रांवर खरेदीची गती मंद
अमरावती जिल्ह्यात डीएमओ अंतर्गत ८ आणि व्हीसीएमएफ अंतर्गत ८ अशी एकूण १६ केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू आहे.
नोंदणीला मुदतवाढ दिल्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र शेड्युलिंगनंतरही प्रत्यक्ष खरेदीची गती अपेक्षेप्रमाणे नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.
आतापर्यंतची खरेदी
डीएमओ : २,१५६ शेतकऱ्यांकडून ४४,३६३ क्विंटल
व्हीसीएमएफ : १,६२५ शेतकऱ्यांकडून ३१,६२६ क्विंटल
एकूण : ३,७८१ शेतकऱ्यांकडून ७५,९८९ क्विंटल
नोंदणीचा आढावा
डीएमओ : ७,९६२ शेतकरी
व्हीसीएमएफ : ५,९३० शेतकरी
एकूण नोंदणी : १३,८९२ शेतकरी
खरेदी मुदतीबाबत शंका
शासनमान्य दराने सोयाबीन खरेदीचा प्रारंभ १५ नोव्हेंबरपासून झाला असून, नियमांनुसार ९० दिवसांपर्यंत म्हणजेच साधारणपणे १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत खरेदी सुरू राहणार आहे. मात्र, प्रत्यक्षात खरेदीचा वेग पाहता, या कालावधीत सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होईल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांची मागणी काय?
नोंदणीला महिनाभर मुदतवाढ देण्यात आली असली, तरी खरेदीची गती वाढविणे अत्यावश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
अन्यथा खरेदी कालावधी वाढवावा किंवा खासगी बाजार व हमीभावातील दरफरक थेट शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Kharedi : नोंदणी करूनही सोयाबीन खरेदी नाही; काय आहे कारण वाचा सविस्तर
Web Summary : Farmers get relief as NAFED extends soybean registration to January 31st. Despite the extension, farmers are urging faster procurement at the 16 centers due to low private market rates. Purchase rate needs improvement.
Web Summary : किसानों को राहत मिली क्योंकि नाफेड ने सोयाबीन पंजीकरण 31 जनवरी तक बढ़ाया। विस्तार के बावजूद, किसान 16 केंद्रों पर तेजी से खरीद का आग्रह कर रहे हैं क्योंकि निजी बाजार दरें कम हैं। खरीद दर में सुधार की आवश्यकता है।