Join us

Nachani Idali : नाचणीचे पीठ वापरून तयार करा झटपट इडली, अशी आहे सोपी रेसिपी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 20:25 IST

Nachani Idali : नाचणीचे पीठ वापरून तयार केलेली लज्जतदार लुसलुशीत इडलीसुद्धा छान लागते. आणि पौष्टिकही आहे.

Nachani Idali : गरमागरम वाफाळती इडली आणि त्यासोबत मस्त चटणी आणि सांबार म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. इतरांप्रमाणेच नेहमीची डाळ-तांदूळ वापरून केलेली इडलीच जास्त वेळा केली जाते. पण नाचणीचे पीठ वापरून तयार केलेली लज्जतदार लुसलुशीत इडलीसुद्धा छान लागते. आणि पौष्टिकही आहे.

लागणारे साहित्य : दोन वाट्या नाचणी, १ वाटी उडीद डाळ, १ वाटी तांदूळ, एक चमचा मेथी दाणे, चवीनुसार मीठ आणि तेल.

बनविण्याची कृती

  • नाचणी, उडीद डाळ, तांदूळ आणि मेथीचे दाणे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे. 
  • एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सात ते आठ तासांसाठी भिजत ठेवावे. 
  • त्यानंतर त्यातील पाणी काढून टाकावे आणि मिक्सरमधून थोडे पाणी टाकून अगदी बारीक वाटून घ्यावे. 
  • वाटलेले मिश्रण एका मातीच्या भांड्यात काढावे. ते मिश्रण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवावे. 
  • दुसऱ्या दिवशी पीठ छान आंबवून वर आलेले दिसेल. पीठामध्ये चवीनुसार मीठ व थोडे पाणी टाकून फेटावे. 
  • इडली पात्राला थोडे तेल लावून मिश्रण त्यात भरावे व मध्यम अचेवर १५ ते २० मिनिटे वाफवून घ्यावे. 
  • चटणी किंवा सांबार सोबत सर्व्ह करावे. 
English
हिंदी सारांश
Web Title : Ragi Idli: Quick, Easy Recipe Using Ragi Flour

Web Summary : Make delicious and nutritious ragi idli easily! Soak ragi, urad dal, rice, and fenugreek seeds overnight. Grind, ferment, and steam for a healthy breakfast served with chutney or sambar.
टॅग्स :पाककृतीशेती क्षेत्रशेतीनाचणी