Join us
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात मोहफुलांचा हंगाम, पहाटेपासून वेचणी, आदिवासींना रोजगार, दर कसा मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 19:35 IST

Mohfule Season : सध्या मोहाच्या झाडांना भरघोस बहार आली असून परिसरात मोहफुलांचा सुगंध दरवळू लागला आहे.

- सायसिंग पाडवीनंदुरबार : सातपुड्याच्या गाव-पाड्यांमध्ये सध्या महूच्या झाडांना भरघोस बहार आली असून परिसरात महूफुलांचा सुगंध दरवळू लागला आहे. या फुलांच्या वेचणीसाठी पहाटेपासूनच गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण कामाला लागलेले दिसून येत आहेत.

अक्कलुवा तालुक्यातील सरी, हुणाखांब, दहेल, मोगरा, ओहता, कुवा, खाई, मोलगी, डाब आणि पिंपळखुंटा व धडगाव तालुक्यातील निगदी, मांडवी बु, मांडवी खु, खरवड, मोख, सुरवाणी, रोषमाळ तर शहादा तालुक्यातील दरा, राणीपूर, नवागाव आदी परिसरात वेचणी सुरू आहे. ही फुले घरी आणल्यानंतर घराच्या छतावर किंवा स्वच्छ कोरड्या जागेत पसरवून वाळविली जात आहेत. पूर्णपणे सुकल्यानंतर ती बाजारपेठेत विक्रीसाठी नेली जातात. 

टोळंबीपासून तेलआदिवासी बांधव पारंपरिक महूच्या झाडाच्या टोळंबीपासून पद्धतीने आयुर्वेदिक तेल तयार करतात. या तेलाचा वापर औषधी उपयोगासाठी केला जातो. महूच्या झाडापासून चांगले उत्पन्न मिळत असल्याने आदिवासी समाज ही झाडे जपून ठेवतो. त्यामुळे सातपुड्याच्या गाव-पाड्यांत आजही मोठमोठी डेरेदार महूची झाडे टिकून आहेत.

घराच्या छतावर फुले पसरविली जातातकुटुंबातील सर्व सदस्य पहाटेपासूनच पडलेली फुले गोळा करत असून, ती घरी आणल्यानंतर छतावरील स्वच्छ व कोरड्या जागेत पसरविली जात आहे. ती सुकल्यानंतर विक्रीसाठी नेतात.

धार्मिक व पारंपरिक महत्त्वआदिवासी समाजात महूफुलांना धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. पूजा-विधी तसेच लग्नसमारंभ आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये या फुलांचा वापर केला जातो. आयुर्वेदिक गुणधर्मामुळे काही कुटुंबे महूफुलांपासून घरगुती तेल तयार करून त्याचा वापर पारंपरिक पद्धतीने करताना दिसतात.

विविध खाद्य पदार्थ तयार करण्यात येतातमहूफुलांपासून तेल, बिस्किटे, लाडू तसेच सुगंधी द्रव्यांसह विविध खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे या फुलांना स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी असते. त्यामुळे सातपुड्याच्या कुशीत महूफुलांची वेचणी हा अनेक कुटुंबांसाठी महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत ठरत आहेत.

 

हेही वाचा : घरावरील सौरऊर्जा प्रकल्प 15 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार, 'या' ग्राहकांना मिळणार लाभ

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mahua flower season in Satpuda provides income for tribals.

Web Summary : Satpuda's tribal communities are harvesting mahua flowers, a vital income source. These flowers are used in food, traditional medicine, and religious ceremonies, boosting the local economy.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीनंदुरबार