- कौसर खान
सिरोंचा : उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठेत विविध जातींच्या आंब्यांची मांदियाळी सुरू होते. हापूस, केसर, पायरी अशा अनेक नावांनी ग्राहक आकर्षित होतात. मात्र, गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या सिरोंचा येथील 'कलेक्टर' आंब्याचा रुबाब काही औरच आहे.
दीड ते दोन किलो वजनाचा हा महाकाय आंबा सध्या बाजारपेठेत दाखल झाला असून, त्याची चव चाखण्यासाठी केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर मंत्री आणि सनदी अधिकारीही विशेष उत्सुक असतात. हा आंबा केवळ फळ नाही, तर सिरोंचाच्या ऐतिहासिक वैभवाचा जिवंत वारसा आहे.
राजमान्य अन् लोकमान्य!"सिरोंचाचा झिंगा जितका प्रसिद्ध आहे, तितकाच हा 'कलेक्टर' आंबाही येथील वैभव आहे. उन्हाळ्यात सिरोंचाला भेट देणारे लोकप्रतिनीधी वा मोठे आयएएस अधिकारी, या आंब्यावर ताव मारल्याशिवाय जात नाहीत. राज्याच्या अनेक मंत्र्यांनीही या आंब्याच्या चवीची प्रशंसा केली आहे.
काय आहे 'कलेक्टर ऑफ सिरोंचा'चा इतिहास ?या आंब्याला 'कलेक्टर' नाव पडण्यामागे एक रंजक आणि ऐतिहासिक संदर्भआहे, जो वाचून अनेकदा नागरिक भ्रमात पडतात. ब्रिटीश राजवटीत सिरोंचा हे जिल्ह्याचे मुख्यालय होते. त्याकाळी पश्चिम गोदावरीचे तत्कालीन कलेक्टर 'ग्लासफोर्ड' यांनी या भागात आंब्याची काही विशेष कलमे बाहेरून आणून लावली होती.
एका जिल्हाधिका-याने (कलेक्टरने) ही कलमे लावून या वाणाची जोपासना केल्यामुळे आणि फळाचा आकार अत्यंत राजबिंडा असल्यामुळे, हा आंबा 'कलेक्टर आंबा' या नावानेच प्रसिद्ध झाला. आजही पंचायत समितीचे माजी सभापती विशेषवरराव कोंड्रा यांच्या शेतात या ऐतिहासिक झाडांचा डौल कायम आहे. ब्रिटीश काळातील ही झाडे आजही तितक्याच जोमाने फळांनी लगडलेली दिसतात.
हेही वाचा : आजपासून घरगुती लाईट स्वस्त झाली, 100 युनिटपर्यंत किती पैसे भरावे लागतील, वाचा सविस्तर
Web Summary : Sirocha's 'Collector' mango, weighing up to 2kg, attracts everyone with its unique taste. Named after a British collector who cultivated it, this mango represents the historical richness of Sirocha. High-ranking officials and ministers admire it, and the original trees still flourish.
Web Summary : सिरोंचा का 'कलेक्टर' आम, जिसका वजन 2 किलो तक होता है, अपने अनोखे स्वाद से सभी को आकर्षित करता है। एक ब्रिटिश कलेक्टर के नाम पर, जिसने इसे उगाया, यह आम सिरोंचा की ऐतिहासिक समृद्धि का प्रतिनिधित्व करता है। उच्च पदस्थ अधिकारी और मंत्री इसकी प्रशंसा करते हैं, और मूल पेड़ अभी भी फलते-फूलते हैं।