Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mango Flowering Delay : बदलत्या हवामानाचा फटका; आंबा मोहोरात महिनाभर विलंब वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:02 IST

Mango Flowering Delay : यंदाच्या अनियमित हवामानाने आंबा उत्पादक शेतकरी थेट अडचणीत सापडले आहेत. कधी अचानक वाढणारी उष्णता, कधी गारठा, तर कधी लांबलेला पाऊस या हवामानातील खेळामुळे आंबा कलमांवरील मोहोर येण्यास तब्बल एक महिना उशीर झाला आहे. दरवर्षी ऑक्टोबर अखेरीस येणारा पहिला मोहोर यंदा नोव्हेंबर अखेरीस येऊ लागला आहे.(Mango Flowering Delay)

Mango Flowering Delay : धाराशिव जिल्ह्यात यंदा आंबा बागांना थंडी-उष्णतेचा अनियमित खेळ आणि लांबलेल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. दरवर्षी ऑक्टोबरअखेर लागणारा आंबा मोहोर यंदा तब्बल एक महिना उशिरा, म्हणजे नोव्हेंबरअखेरीस येऊ लागला आहे.(Mango Flowering Delay)

हवामानातील या ताणतणावामुळे फळधारणेवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील १,०९५ शेतकऱ्यांच्या १,१३४ हेक्टर आंबा क्षेत्रावर या विलंबाचा थेट परिणाम दिसू लागला आहे.(Mango Flowering Delay)

यंदाच्या अनियमित हवामानाने आंबा उत्पादक शेतकरी थेट अडचणीत सापडले आहेत. कधी अचानक वाढणारी उष्णता, कधी गारठा, तर कधी लांबलेला पाऊस या हवामानातील खेळामुळे आंबा कलमांवरील मोहोर येण्यास तब्बल एक महिना उशीर झाला आहे. दरवर्षी ऑक्टोबर अखेरीस येणारा पहिला मोहोर यंदा नोव्हेंबर अखेरीस येऊ लागला आहे.(Mango Flowering Delay)

या उशिराचा फटका थेट आंब्याच्या तोडणीवर बसणार असून शेतकऱ्यांना उत्पादनात घट आणि आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.(Mango Flowering Delay)

१ हजार १३४ हेक्टरवर आंबा लागवड

धाराशिव जिल्ह्यात आंबा लागवडीला मोठी ओढ असल्याने जिल्ह्यातील १,१३४ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर आंबा कलमांची लागवड केली आहे.

१,०९५ शेतकरी आंबा लागवडीशी संबंधित

सर्वाधिक लागवड केशर व गावराण आंब्याची

मात्र, या हंगामात हवामानाचा ताण संपूर्ण बागांवर जाणवत आहे.

मोहोर एक महिन्याने उशिरा

शेतकऱ्यांचे म्हणणे काही फांद्यांना मोहोर ऑक्टोबरमध्ये लागला

उर्वरित फांद्यांना मोहोर नोव्हेंबरमध्ये

काही कलमांवर एकीकडे मोहोर, तर दुसरीकडे पालवी

त्यामुळे हंगाम कमीतकमी एक महिना उशिरा येईल

बदलत्या वातावरणामुळे आंब्याच्या वाढीचा नैसर्गिक चक्रच विस्कटले आहे.

ढगाळ हवामानाचा धोका

नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीत वाढ झाली होती, त्यामुळे आंबा उत्पादकांनी दिलासा मानला होता.

परंतु नोव्हेंबरअखेरीस पुन्हा ढगाळ वातावरण सुरू झाले

* मोहोर झडण्याची भीती निर्माण झाली

* सध्या केवळ २०% बागांमध्ये मोहोरासाठी पोषक हवामान

* गतवर्षी दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला अत्यल्प फळधारणा झाली होती — यंदा त्याचा पुनरावृत्तीचा धोका

आंबा कलमांना पोषक तत्त्वांची तातडीची गरज

कृषी विभागाने शेतकऱ्यांना तातडीचे मार्गदर्शन केले आहे.

* फवारणी न केल्यास फळधारणा कमी

* बदलत्या हवामानामुळे कीटकनाशक फवारणी आवश्यक

* खत व पाण्याचा योग्य पुरवठा केल्यास लागलेले फळ वाया जाणार नाही

* सतत पालवी आल्यास पोषकद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते

यंदा हवामानातील बदलामुळे मोहोर लागण्यास उशीर होत आहे. मात्र शेतकऱ्यांनी आंबा कलमांना आवश्यक खत व पाणी योग्य वेळी दिल्यास फळधारणा कायम राहील आणि चांगला हंगाम येईल.- राजकुमार मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव

शेतकऱ्यांची चिंता वाढली

* बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादकांमध्ये चिंता

* मोहोर उशिरा हंगाम उशिरा

* तोडणी वेळ चुकल्यास बाजारभावातील फरक

* उत्पादनात घट

* बागेचा देखभाल खर्च वाढणार

यंदा सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आंबा बागांना अपेक्षित वातावरण मिळत नाही. मोहोर एक महिना उशिरा लागल्याने मोठा फटका बसू शकतो. - सुरेंद्र झांबरे, शेतकरी

धाराशिव जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम आव्हानात्मक ठरणार आहे. हवामानातील अनिश्चितता, मोहोरातील विलंब आणि ढगाळ वातावरणामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. योग्य व्यवस्थापन, खत आणि पाण्याचा पुरवठा व वेळेवर फवारणी हीच आंबा उत्पादकांसाठी सध्याची किल्ली ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर :Maize Cultivation : मका लागवड भोवली; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Erratic Weather Threatens Mango Crop, Farmers Face Potential Losses

Web Summary : Unpredictable weather delays mango blooming in Dharashiv, impacting farmers. A month's delay and inconsistent flowering patterns threaten yields. Experts advise nutrient management to mitigate losses across 1,134 hectares of mango cultivation.
टॅग्स :शेती क्षेत्रआंबाशेतकरीशेती