Join us

Dhencha Seed : हिरवळचे खत बियाणे 50 टक्के अनुदानावर महाडीबीटीवर उपलब्ध करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 20:40 IST

Agriculture News : पिकांसाठी माती अधिक सुपीक होते. ढेंचा बियाणे पेरून, ते वाढल्यावर जमिनीमध्ये नांगरून, ते खत म्हणून वापरले जाते.

भंडारा : ढेंचा हिरवळीचे खत (Dhencha Seed) म्हणून ओळखले जाते. हे हिरवळीचे खत आहे. नायट्रोजन आणि इतर पोषक तत्त्वे मातीत वाढवते. पिकांसाठी माती अधिक सुपीक होते. ढेंचा बियाणे पेरून, ते वाढल्यावर जमिनीमध्ये नांगरून, ते खत म्हणून वापरले जाते. त्यामुळे ढँचा बियाणे ५० टक्के अनुदानावर Seed Subsidy) शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भंडारा किसान सभेचे जिल्हाध्यक्ष माधवराव बांते यांनी केली.

महाबीजकडून (Mahabeej) मिळणाऱ्या ढेंचा बियाण्याची किंमत १३० प्रतिकिलो आहे. महाबीजच्या ढेंच्याचे उत्कृष्ट बियाणे बाजारात उपलब्ध असले तरी ते महाग आहे. त्यामुळे ते बियाणे शेतकरी खरेदी करू शकत नाही. शेतीमध्ये रासायनिक खतांच्या वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळीचे खत धान शेती करता आवश्यक आहे.

भंडारा जिल्हा परिषद कडून शेतकऱ्यांना ताडपत्री व कृषी संबंधित पाईप खरेदी करण्यावर डीबीटी प्रणाली नुसार अनुदान मिळणार आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत हिरवळीचे खत शेती तयार करावे यासाठी शेतकऱ्यांना ढेंचा खरेदी करता ५० टक्के अनुदानावर सवलत मिळत आहे. 

त्याच धर्तीवर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भंडारा जिल्हा परिषदेतर्फे हिरवळीचे खताकरिता महाबीज महामंडळाचे ढेंचा खरेदीकरिता ५० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष माधवराव बांते यांनी शासनाला व जिल्हा परिषदेला निवेदन दिले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपीक व्यवस्थापनपेरणी