Join us

'फेस ॲप'वर नोंदणी नसेल तर पगार नाही, महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता नवा नियम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:52 IST

Agriculture News : राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांपासून ते जिल्हाधिकारी वर्गासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Agriculture News :  राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांपासून ते जिल्हाधिकारी वर्गासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या कर्मचारी, अधिकाऱ्यांना 'फेस ॲप'वर (Face App) हजेरी लावावी लागणार आहे, अन्यथा त्या दिवसाचा पगार कापण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

राज्यातील महसूल विभागातील तलाठ्यापासून ते जिल्हाधिकारी पर्यंत, तहसीलदारापासून ते DYLR पर्यंत, मोजणी अधिकाऱ्यापासून ते नोंदणी अधिकाऱ्यांपर्यंत या विभागातील सर्व अधिकारी फेस ॲप वर येतील. म्हणजे 'ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे,

'एखाद्या तलाठ्याची नोकरीच्या गावात आहे, त्या गावात जाऊनच त्याला फेस ॲप वर नोंदणी म्हणजेच हजेरी द्यावी लागेल, हजेरी लागली तरच पगार मिळणार आहे', अशी माहिती यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

फेस ॲप अनिवार्य करण्यात आले असून फेस ॲपवर जर आपण अंगठा दाखवला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. यापूर्वी असे प्रयोग करण्यात आले आहेत. मात्र आता थेट फेस ॲपचा प्रयोग करण्यात येत आहे. तसेच 'फेस ॲपवर जेव्हा नोंदणी केली जाईल, तेव्हा नोकरीवर हक्क सांगता येईल, ज्या दिवशी हे ॲपवर नोंदणी केली जाणार नाही त्या दिवशी तो अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याचे समजले जाईल', असे आदेश मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. 

हजर नाही तर पगार नाहीराज्यातील सर्व तलाठी, नायब तहसीलदार तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांना या फेस ॲपवर (Face App) रोजची उपस्थिती नोंद धारक असे उपस्थिती नोंदविल्याशिवाय पगार कापला जाणार  आहे. महसूल यंत्रणेतील शिस्तबद्धतेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे मनमानी गैरहजेरीता आळा बसेल, असा सरकारचा दावा आहे. 

टॅग्स :महसूल विभागशेती क्षेत्रजिल्हाधिकारीचंद्रशेखर बावनकुळे