Join us

घरचं लाईटबील कसं वाचायचं, लाईट किती वापरल्यावर किती युनिट होतं, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:20 IST

Light Bill : आपण जी वीज वापरतो त्या विजेचे बिल म्हणजेच लाईट बिल हे दर महिन्याला आपल्याला महावितरण विभागाकडून येत असतं. 

Light Bill : लाईट बिल म्हटल्यावर हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग म्हणून ओळखला जातो. आपण जी वीज वापरतो त्या विजेचे बिल म्हणजेच लाईट बिल हे दर महिन्याला आपल्याला महावितरण विभागाकडून येत असतं. 

मात्र अनेकदा आपण किती वीज वापरली? किती युनिट झाले? त्यावरून आपल्याला किती लाईट बिल यायला हवं, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यासह नेमकं लाईट बिल (electricity bill0 कसं वाचायचं या सर्व प्रश्नांची उत्तर या लेखातून पाहूयात...

आपल्या घरात सर्वसाधारण एखादी ट्यूब, दोन-तीन बल्ब टीव्ही अशा प्रकारची विजेची उपकरण असतात. आता आपल्याला लाईट बिल समजून घ्यायचं असल्यास उदाहरण म्हणून एका बल्बचा विचार करूया...

तुम्ही लाईट बिलमध्ये युनिट नावाचा शब्द ऐकला असेल. हे युनिट म्हणजे काय तर एक किलो वॅट तास एवढी वीज. ही एवढी वीज किंवा लाईट वापरू तेव्हा आपल्याला एक युनिट पडणार आहे. जर समजा घरातील वापरत असलेला बल ५० वॅटचा आहे तर तो बल्ब एका तासात ५० वॅट ऊर्जा खर्च करत असतो. 

मग एक किलो वॅट म्हणजे १ हजार वॅट होय. जर आपण १ हजार किलो वॅट ऊर्जा किंवा वीज वापरू त्यावेळी आपल्याला एक युनिट बिल पडणार आहे. म्हणजे आपल्या घरातील एक बल्प ५० वॅटचा असल्यास तो जवळपास २० तास चालणार आहे. म्हणजेच एकूण १ हजार किलो वॅट इतकी वीज वापरली जाणार आहे आणि यासाठी एक युनिट बिल येणार आहे. 

आता आपण एका बल्बचा उदाहरण पाहिलं. याच अनुषंगाने आपल्या घरातील इतर उपकरणांच्या माध्यमातून किती लाईट वापरली आहे आणि आपल्याला लाईट बिल नेमकं किती आले आहे, हे समजून घेता येईल.

हेही वाचा : जमिनीची वाटणी म्हणजे खातेवाटप कसे करायचे, हरकत असल्यास काय करावे? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Easy tips to reduce your home electricity bill effectively.

Web Summary : Understand your electricity bill! Learn how unit consumption affects your bill. A 50-watt bulb used for 20 hours equals one unit. Calculate appliance usage to estimate your bill. Save money by tracking energy consumption.
टॅग्स :शेती क्षेत्रमहावितरणभारनियमनवीजशेती