Mahadbt Scheme : महाडीबीटी प्रणालीवर (Mahadbt Scheme) मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना सन २०२५-२६- वैयक्तिक शेततळे था घटकांतर्गत काढण्यात आलेल्या लॉटरीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.
माहे मे 2025 मध्ये काढण्यात आलेल्या वैयक्तिक शेततळे घटकाच्या (Shettale Yojana) सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांची निवड ही जानेवारी 2026 पर्यंत वैध राहील. अशी माहिती देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र संचालक, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यालय, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांनी निर्गमित केले आहे.
महाडीबीटी प्रणालीवर मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकांतर्गत सन २०२५-२६ साठी प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार १३ हजार २२६ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी, आत्तापर्यंत ३५४५ शेतकऱ्यानी कागदपत्रे अपलोड कला आहेत.
सद्यस्थितीत पावसामुळे शेततळे खोदता येत नसल्याने इच्छुक असूनही कागदपत्रे अपलोड करण्यासाठी शेतक-यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यास्तव, निवडण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज माहे जानेवारी २०२६ पर्यंत महाडीबीटी प्रणालीवरून रद्द करण्यात येऊ नयेत, असे परिपत्रकाद्वारे सांगण्यात आ;ए आहे.