नाशिक : पशुधनावर संकट आणणाऱ्या 'लम्पी' रोगाने (Lumpy Disease) अनेक जिल्ह्यांत पुन्हा कहर केला आहे. नाशिक जिल्ह्यात (Nashik District) लम्पीने फारसे डोके वर काढले नसले तरी सावधानता आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात आले. बाकीच्या तालुक्यात नियंत्रणात आहे. सिन्नर व निफाड तालुक्यात केवळ ८० जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे.
राज्यातील इतर ठिकाणी लम्पीने गुरे दगावताय, योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याने नाशिक जिल्ह्यात मात्र एकही गुराचा मृत्यू लम्पीने झालेला नसल्याने दिलासा आहे. कारण जिल्ह्यात ६ लाख १० हजार जनावरांचे लसीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले होते. जिल्ह्यात ज्या जनावरांना लम्पी झाला. त्यांचे आधीच लसीकरण झाल्याने रोग वेळेवर नियंत्रणात येऊन या जनावरांचा जीव वाचला.
लम्पी आजाराची कारणे, लक्षणे, निदान कसे?लम्पी स्किन डिसीज हा गुरांमध्ये (विशेषतः गाय आणि म्हैस) होणारा एक विषाणूजन्य रोग आहे. हा रोग 'गाठ (लंप)' असलेल्या त्वचेच्या गाठींमुळे होतो, ज्यामुळे जनावरांमध्ये ताप, लंगडणे आणि दूध उत्पादन घटणे यांसारख्या समस्या येतात.
लम्पी झाल्याने शासनाकडून काय मिळते मदत ?२०२२ मध्येही राज्यात लम्पीची साथ पसरली होती. तेव्हा मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली होती. ती संख्या एकेका जिल्ह्यात शेकड्याने होती. सरकारने लम्पीमुळे मृत्यू झालेल्या दुधाळ गायीला ३० हजार, बैलासाठी २५ हजार तर वासराला १६ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. सध्या मात्र पशुमालकांना आर्थिक मदत नाही. मात्र मोफत उपचार व मोफत लसीकरण आहे.
लम्पीचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनालम्पी त्वचेच्या रोगासाठी लसीकरण हा प्रतिबंधात्मक उपाय आहे. जनावरांना गोठ्यात ठेवणे आणि कीटकांचा (डास, माश्या, गोचीड) प्रादुर्भाव टाळण्यासाठी जाळ्या लावणे. बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवणे, जनावरांची नियमितपणे तपासणी करणे असे प्राथमिक उपाय आहे.
लसीकरणानंतरही लम्पीवर नियंत्रण : डॉ. धर्माधिकारीपशुसंवर्धन आयुक्त डॉ. धर्माधिकारी म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण करण्यात आले. लसीकरणाच्या वेळी कमी वयाच्या काही वासरांना लस न दिल्याने त्यांच्याच लम्पीचा प्रार्दुभाव दिसून आला. ६ लाख जनावरांचे लसीकरण वेळेत केल्याने नाशिक जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेने लम्पीचा फारसा प्रादुर्भाव नाही.
Kanda Market : सोलापूर, नागपूरसह नाशिकमध्ये कांद्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर