Jamin Malaki : जमिनीवर १२ वर्षांपेक्षा जास्त काळ सलग, उघडपणे आणि मूळ मालकाच्या संमतीशिवाय ताबा (Adverse Possession) असल्यास कायदेशीररित्या मालकी हक्क मागता येतो का? कुठल्या जमिनीला हा नियम होतो किंवा होत नाही, मालकी सिद्ध करण्यासाठी काय महत्वाचे असते, हे समजून घेऊयात... असं म्हणतात, ज्याची जमीन त्याची मालकी. पण हा अर्थ ताबा (Possession) या कायदेशीर तत्वावरून येतो. भारतात खालील कायदे या गोष्टीशी संबंधित आहेत : 1. Specific Relief Act, 1963 – कलम 5 आणि 6• एखाद्या मालमत्तेवर ज्याचा प्रत्यक्ष ताबा (possession) आहे, त्याला कायद्याने संरक्षण मिळते.• कोणाला बेकायदेशीरपणे हाकलून दिले तर तो व्यक्ती कोर्टात जाऊन ताबा परत मिळवू शकतो.
2. Indian Evidence Act, 1872 – कलम 110• जर एखाद्या व्यक्तीकडे जमीन / मालमत्तेचा ताबा आहे, तर तोच मालक आहे असे प्राथमिक अनुमान (presumption) धरले जाते, जोपर्यंत दुसरा कोणी मालकी सिद्ध करत नाही.
3. Limitation Act, 1963 – Adverse Possession• जर कोणी १२ वर्षे सतत ताब्यात जमीन ठेवली आणि मूळ मालकाने दावा केला नाही, तर त्या व्यक्तीला मालकी हक्क मिळू शकतो.
सरळ भाषेत सांगायचे झाले तर कायद्यात असे मानले जाते की ज्याच्या ताब्यात मालमत्ता आहे तो मालक असण्याची शक्यता जास्त असते, पण अंतिम मालकी कागदपत्रे आणि कोर्टाच्या निर्णयावर ठरते. ताबा किंवा मालकी मिळवण्याचे काही मुद्दे पाहुयात...
ताबा आणि मालकी मिळवण्याचे मुख्य मुद्दे:
- प्रतिकूल ताबा (Adverse Possession) : जर तुम्ही खाजगी जमिनीवर सलग १२ वर्षे कोणताही अडथळा नसताना राहत असाल किंवा शेती करत असाल, तर तुम्ही मालकी हक्क सांगू शकता.
- शर्ती : ताबा उघडपणे (घोषित), अनधिकृत आणि मालकाच्या माहितीशिवाय (किंवा मालकाने हरकत न घेता) असावा.
- सरकारी जमीन : सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून मालकी हक्क मिळवता येत नाही, ती जनतेची मालमत्ता असते.
- कायदेशीर प्रक्रिया : जर मूळ मालकाने १२ वर्षांत कायदेशीर कारवाई (दावा) केली नाही, तर ताबा असणारी व्यक्ती न्यायालयात दावा दाखल करून मालकी हक्काची मागणी करू शकते.
- सातबारा उतारा : केवळ ताबा असून चालत नाही, तर सातबारा उताऱ्यावर नाव असणे मालकी हक्कासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या महसूल विभागाशी संपर्क साधा. किंवा एखाद्या वकिलाचा सल्ला घ्या.
हेही वाचा : जमीन मोजणी केली, पण मोजणीत तफावत आढळत आहे, काय करावे? वाचा संपूर्ण प्रक्रिया
Web Summary : Can you claim land ownership after 12 years of possession? Law says continuous, open possession without owner's consent may grant rights. Crucially, this doesn't apply to government land. Seven-twelve extract (Satbara Utara) is vital. Consult revenue officials or a lawyer for details.
Web Summary : क्या आप 12 साल के कब्जे के बाद भूमि स्वामित्व का दावा कर सकते हैं? कानून कहता है कि मालिक की सहमति के बिना निरंतर, खुला कब्जा अधिकार प्रदान कर सकता है। महत्वपूर्ण रूप से, यह सरकारी भूमि पर लागू नहीं होता है। सात-बारह उद्धरण (सातबारा उतारा) महत्वपूर्ण है। विवरण के लिए राजस्व अधिकारियों या वकील से परामर्श करें।