विजय सरवदे
ग्रामीण भागात बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे. केंद्र शासनाच्या 'लखपतीदीदी' योजनेमुळे तब्बल ७४ हजार महिलांनी घराच्या चौकटीतून बाहेर पडत स्वतः ची ओळख 'उद्योजिका' म्हणून निर्माण केली आहे. (lakhpati Didi Scheme)
यंदा आणखी ६८ हजार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. उमेदने (Umed) दिलेल्या संधीमुळे आज या महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची झळाळी दिसत आहे.(lakhpati Didi Scheme)
कधीकाळी फक्त संसाराच्या चौकटीत अडकलेल्या ग्रामीण महिलांनी आता आपल्या कर्तृत्वाचा नवा अध्याय लिहायला सुरुवात केली आहे. (lakhpati Didi Scheme)
केंद्र शासनाच्या 'लखपतीदीदी' योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ७४ हजार महिलांनी केवळ बचत गटांमध्ये सहभागच घेतला नाही, तर स्वयंरोगाराच्या माध्यमातून 'उद्योजिका' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.(lakhpati Didi Scheme)
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'उमेद' (Umed) अभियानाच्या माध्यमातून बचत गटाची चळवळ गावखेड्यापर्यंत पोहोचली असून चालू आर्थिक वर्षात ६८ हजार महिलांना लखपतीदीदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. (lakhpati Didi Scheme)
महिलांचासुद्धा उद्योग क्षेत्रात सहभाग वाढावा. त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणास बळ मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने 'लखपतीदीदी' ही योजना हाती घेतली आहे. (lakhpati Didi Scheme)
ग्रामीण भागात लखपतीदीदी हा शब्द परवलीचा झाला आहे; पण अजूनही शहरी भागात 'लखपतीदीदी म्हणजे काय', हे कोडे उमगलेले नाही.
मागील काही वर्षांपासून महिला सशक्तीकरणावर शासनाचा विशेष भर आहे. यात आता प्रामुख्याने उद्योग, व्यवसायांत महिलांना चालना देण्यासाठी लखपतीदीदी योजनेवर अधिक भर दिला जात आहे.
ही योजना केवळ बचत गटाशी संबंधित महिलांसाठीच असून स्वयंरोजगारासाठी महिलांना १ ते ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते.
गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, शेती, दुग्धव्यवसाय अशा विविध क्षेत्रांतील स्वयंरोजगारविषयक महिलांचा कल जाणून घेण्यात आला. त्यानंतर संबंधित उद्योगाबाबत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले.
प्रत्यक्षात उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. सद्यस्थितीत या लखपतीदीदींचे वार्षिक उत्पन्न १ लाखांच्या पुढे गेले आहे.
६० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत सुरुवातीला निधी देऊन लघु उद्योगासाठी प्रोत्साहन दिले जाते आहे.
स्वयंरोजगाराचे पाठबळ
बचत गटातील महिला सदस्यांच्या कुटुंबाची माहिती घेतली जाते. त्यासंबंधीचा सूक्ष्म गुंतवणूक आराखडा तयार केला जातो. मागणी प्राप्त झाल्यानंतर ग्राम संघामार्फत सुरुवातीला ६० हजार ते १ लाखापर्यंत सूक्ष्म गुंतवणूक निधी देऊन स्वयंरोजगारासाठी पाठबळ दिले जाते. - विक्रम सरगर, जिल्हा व्यवस्थापक, 'उमेद'