Join us

Krushi Sinchan Yojana : सूक्ष्म कृषी सिंचन योजनेच्या अनुदानाबाबत महत्वाचा शासन निर्णय, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:30 IST

Krushi Sinchan Yojana : शेतकऱ्यांना पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचे (Micro Irrigation) साहित्य खरेदीसाठी अनुदान देण्यात येते.

Krushi Sinchan Yojana :  सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून (Micro Irrigation Scheme)  कमीत कमी पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादन घेणे अपेक्षित असते. अशा शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र अनेक महिन्यांपासून रानातील काही शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काही शेतकऱ्यांसाठी दिलासायक बातमी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेसाठी १४४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

सूक्ष्म सिंचन योजनेसाठी, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत अनुदान (Krushi Sinchan Yojana Anudan) दिले जाते. शेतकऱ्यांना पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचे साहित्य खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८० टक्के तर एससी, एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदानाची तरतूद आहे. यासाठी लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात.

दरम्यान आजच्या मंत्रीमंडळ बैठकीच्या माध्यमातून या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून यातील लाभार्थी शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. अखेर आज या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत सन २०२४-२५ मध्ये (सूक्ष्म सिंचन) घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या पूरक अनुदानाकरिता १४४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 

अशी आहे योजना 

सूक्ष्म सिंचन ही सिंचनाची एक आधुनिक पद्धत आहे. या पद्धतीत, ड्रीपर, स्प्रिंकलर, फॉगर्स आणि इतर उत्सर्जकांद्वारे पाणी सिंचन केले जाते. या योजनेत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के अनुदान आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाते. या योजनेत ठिबक-तुषार सिंचन उभारणीसाठी अल्पभूधारकांना ५५ टक्के अनुदान दिले जाते. या योजनेत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान दिले जाते.

टॅग्स :कृषी योजनाशेतीठिबक सिंचनशेती क्षेत्र