Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kisan Call Center : शेतीची अडचण? एक फोन करा; प्रश्नांना आता मिळणार घरबसल्या उत्तर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:15 IST

Kisan Call Center : शेतीतील कीड-रोग, खत व्यवस्थापन, हवामान बदल किंवा शासकीय योजनांची माहिती हवी आहे का? आता शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रत्येक प्रश्नाचे उत्तर घरबसल्या मिळणार आहे. वाचा सविस्तर

Kisan Call Center : शेतकऱ्यांना शेतीविषयक समस्या, आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती थेट व सुलभ पद्धतीने मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत 'किसान कॉल सेंटर' ही महत्त्वाची योजना राबवली जात आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती तसेच शेतीपूरक व्यवसायाशी संबंधित मार्गदर्शनासाठी १८००-१८०-१५५१ या टोल-फ्री क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. साळवे यांनी केले आहे.

शेती करताना शेतकऱ्यांच्या कामात पीक लागवड, खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, हवामान बदल, बाजारभाव, पशुसंवर्धन आदी अनेक शंका निर्माण होतात. या शंकांचे निराकरण शेतकऱ्यांच्या स्वतःच्या भाषेत आणि तज्ज्ञांकडून व्हावे, या उद्देशाने २१ जानेवारी २००४ पासून 'किसान कॉल सेंटर' सेवा सुरू करण्यात आली आहे.

सध्या इफ्को किसान संचार लिमिटेडद्वारे या सेवेचे व्यवस्थापन करण्यात येत असून, देशभरात ३८२ प्रशिक्षित कृषी सल्लागार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्रासाठी या सेवेचे मुख्य कार्यालय पुणे येथे कार्यरत आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

टोल-फ्री क्रमांक : १८००-१८०-१५५१ (पूर्णतः मोफत)

सेवेची वेळ : आठवड्यातील सातही दिवस, सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत

भाषा : देशातील २२ स्थानिक भाषांमध्ये सेवा उपलब्ध; महाराष्ट्रासाठी मराठी भाषेत संवाद

डिजिटल सुविधा : 'किसान ज्ञान व्यवस्थापन प्रणाली'अंतर्गत एसएमएस अलर्ट, कॉल रेकॉर्डिंग आणि dackkms.gov.in हे स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध

कोणती माहिती मिळणार?

किसान कॉल सेंटरवरून शेतकऱ्यांना केवळ पारंपरिक शेतीपुरतीच नव्हे, तर शेती व शेतीपूरक विविध क्षेत्रांतील अद्ययावत माहिती मिळू शकते. 

यात फळबाग लागवड, जैवतंत्रज्ञान, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन, रेशीम उद्योग, कृषी अभियांत्रिकी, कृषी विपणन, गृहविज्ञान तसेच जलसंधारण व जलव्यवस्थापन यांचा समावेश आहे.

तसेच विविध शासकीय योजना, अनुदान, नवीन तंत्रज्ञान आणि उत्पन्नवाढीच्या संधींबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या टोल-फ्री क्रमांकाचा आणि संकेतस्थळाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

हे ही वाचा सविस्तर : AI Sugarcane Farming : 'एआय' सांगते किती पाणी, किती वेळ; शेतकऱ्याला थेट मेलवर मिळतो शेती सल्ला

English
हिंदी सारांश
Web Title : Kisan Call Center: Farmers Get Agriculture Solutions at Home with One Call

Web Summary : Farmers can access expert advice on agriculture, technology, and government schemes via the Kisan Call Center (1800-180-1551). Available in 22 languages, it provides guidance on farming, animal husbandry, and more, empowering farmers with vital information.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती