Join us

Kharif Shivar Feri Akola : कृषी तंत्रज्ञानाचा जागर: प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:49 IST

Kharif Shivar Feri Akola : शेतकरी हिताच्या दृष्टीने आयोजित शिवार फेरीला विदर्भातील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या भव्य उपक्रमात तब्बल ४४ हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले. आधुनिक व प्रगत कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहून शेतकऱ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला.(Kharif Shivar Feri Akola)

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय भव्य शिवार फेरीचा समारोप उत्स्फूर्त वातावरणात झाला. (Kharif Shivar Feri Akola)

या फेरीत विदर्भातील तब्बल ४४ हजारांहून अधिक शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवून प्रगत कृषी तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष अवलोकन केले. (Kharif Shivar Feri Akola)

प्रगत तंत्रज्ञानाचा जागर

समारोपीय कार्यक्रमाला मा. डॉ. चारुदत्त मायी, कुलगुरू व अध्यक्ष, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ, नवी दिल्ली हे मुख्य अतिथी होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, शिवार फेरीद्वारे प्रदर्शित प्रगत व आधुनिक कृषी तंत्रज्ञान हा विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती संशोधन पद्धती अंगिकारल्यास त्यांचे उत्पन्न वाढून जीवनमान सुधारेल.(Kharif Shivar Feri Akola)

त्यांनी कृषी विद्यापीठातील मर्यादित मनुष्यबळ असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवार फेरी यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल कौतुक केले.

शेतकरी हिताचे संवर्धन 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरदराव गडाख, कुलगुरू, कृषी विद्यापीठ अकोला होते. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, विद्यापीठाद्वारे विकसित केलेले कमी खर्चाचे व फायदेशीर कृषी नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या गरजेनुसार स्वीकारावे. यामुळे शेती अधिक उत्पादनक्षम होईल.

विधानसभा सदस्य व विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आ. अमित झनक यांनी विद्यापीठाच्या योगदानाचे कौतुक करताना सांगितले की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रगत तंत्रज्ञानाची जोड शेतकऱ्यांच्या मेहनतीला मिळाली तर नैसर्गिक आपत्तीची तीव्रता कमी होऊन शेतकरी जीवनमान उंचावेल.

मान्यवरांची उपस्थिती

या समारोपीय सत्राला प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री, माजी रेशीम संचालक, तसेच विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने, शिक्षण संचालक डॉ. देवानंद पंचभाई, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज ऊंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा प्रचंड उत्साह

शिवार फेरीच्या अंतिम दिवशी अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांसह विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील हजारो शेतकरी तसेच कृषी महाविद्यालये व तंत्र विद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'हा सूर्य, हा जयद्रथ'  या न्यायाने सादर केलेल्या प्रात्यक्षिकांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रगत तंत्रज्ञान स्वीकारण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन

समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे, जनसंपर्क अधिकारी यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. उमेश चिंचमलातपुरे, मुख्य विस्तार अधिकारी यांनी मानले.

शिवार फेरीने विदर्भातील शेतीला प्रगत कृषी तंत्रज्ञानाची नवी दिशा दिली असून, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा कार्यक्रमाच्या यशाचा मोठा पुरावा ठरला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Kharif Shivar Feri Akola : शेतकऱ्यांनी फुलली शिवार फेरी; प्रगत शेतीचा अनुभव वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकृषी विज्ञान केंद्र